शहरात पुन्हा सुरू झाले ‘गुड मॉर्निंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:56 IST2017-08-29T23:56:12+5:302017-08-29T23:56:41+5:30

उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांना गाठून त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करण्याचा ....

'Good morning' resumes in city | शहरात पुन्हा सुरू झाले ‘गुड मॉर्निंग’

शहरात पुन्हा सुरू झाले ‘गुड मॉर्निंग’

ठळक मुद्देपालिकेची मोहीम : शौचालय बांधकामाबाबत जनजागृती, स्वच्छतेसाठी पाऊल

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांना गाठून त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेच्या ‘गुड मॉर्निंग पथकाने’ हाती घेतला आहे. उघड्यावरील शौचास जाण्याच्या प्रकारावर आळा बसावा. शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण करता यावी. यासाठी पालिकेने या पथकाचे गठन केले असून शहरातील विविध भागांत हे पथक सकाळी हा उपक्रम राबवित आहे.
ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचास जाण्याचा प्रकार अधिक आहे, असे नाही, शहरातही हा प्रकार आजही सुरूच आहे. शहरातील कित्येक परिवारांकडे शौचालय नाही. अशात त्यांना दररोज सकाळी उघड्यावर शौचास जावे लागते. तर काहींकडे शौचालय असूनही फक्त सवय जडल्यामुळे ते उघड्यावर शौचास जातात. परिणामी हागणदारीमुक्तीचा शासनाचा संकल्प अद्याप पूर्ण झाला नाही.
हागणदारी मुक्तीसाठी शासनाकडून अभियान राबवून त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र नागरिकांत जोपर्यंत जागृती होत नाही तोवर या अभियानाचा काहीच उपयोग नाही हे यातून सिद्ध होते.
शहरातही उघड्यावरील शौचास जाण्याचे प्रकार सुरू आहे. हा प्रकार संपुष्टात यावा. वातावरण दूषित होऊ नये यासाठी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत नागरी शौचालय बांधकामाची मोहीम शासन राबवित आहे. नगर परिषदेतही शौचालय बांधकामाची ही मोहीम सुरू असून शौचालय नसलेल्या परिवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हजारांच्या घरात शौचालयांचे बांधकाम झाले असून काहींचे बांधकाम सुरू आहे. असे असतानाही एकही कुटूंब यापासून वंचित राहू नये व उघड्यावरील शौचास जाण्याचा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा.
यामुळे वातावरण दूषीत साथरोगांची लागण होवू नये, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. बांधकामासोबतच पालिकेने ‘गुड मॉर्निग’ची मोहिम हाती घेतली होती. यासाठी पालिकेने ‘गुड मॉर्निंग पथक’ गठीत केले व त्याद्वारे उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांना गाठून शौचालय बांधकामाबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाते. आता पुन्हा हे पथक सक्रीय झाले असून शहरातील विविध भागांत जाऊन उघड्यावर शौच करणाºयांना गाठत आहे.
तसेच त्यांना उघड्यावरील शौचास जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगत आहे. शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करीत आहेत. या माध्यमातून शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे.
पथकात यांचा समावेश
पालिके ने सहा पथक गठित केले असून या ‘गुड मॉर्निंग पथकांचे’ प्रमुख प्रशासनिक अधिकारी सी.ए.राणे, परवाना निरीक्षक प्रदीप घोडेश्वर, विधी पर्यवेक्षक संतोष ठवरे, आस्थापना विभागातील कनिष्ठ लिपिक भुपेंद्र शनवारे, यु.जी.धामनगे व स्वच्छता विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन मेश्राम आहेत. हे सर्व अन्य कर्मचाºयांसह निवड करण्यात आलेल्या भागात जावून जनजागृतीचे काम करीत आहेत.
मोहीम सकाळी ६ वाजेपासून
सकाळी ६ वाजतापासून पथकाची ही मोहीम सुरू होते. शहराच्या बाहेरील भागात येत असलेल्या सुर्याटोला, बांधतलाव, मोतीनाला, रिंग रोड, विजयनगर, संजयनगर, छोटा गोंदिया, पिंडकेपार, मोक्षधाम, गौमतनगर, लेटा हनुमान मंदिर, रेल्वे लाईन परिसर, हरिकाशीनगर, सुंदरनगर, कुंभारेनगर आदि परिसरात उघड्यावरील शौचाचे प्रकार आजही सुरू आहेत. त्यामुळे या भागांत जावून जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवित आहेत. नागरिकांत जनजागृती झाल्यावरच उघड्यावरील शौचाच्या प्रकारावर आळा बसेल ही बाब हेरूनच पालिकेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Web Title: 'Good morning' resumes in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.