अच्छे दिन आनेवाले है,ची..प्रतीक्षा
By Admin | Updated: May 17, 2014 00:20 IST2014-05-17T00:20:06+5:302014-05-17T00:20:06+5:30
सोसल मिडीया असो की, इलेक्ट्रानिक मिडीया असो, प्रत्येक मिडायातून थेट घराघरांतील मतदारांपर्यंंत भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पोहोचले. याची फलश्रुती म्हणजे भाजपला देशात,,,,,

अच्छे दिन आनेवाले है,ची..प्रतीक्षा
नरेश रहिले - गोंदिया सोसल मिडीया असो की, इलेक्ट्रानिक मिडीया असो, प्रत्येक मिडायातून थेट घराघरांतील मतदारांपर्यंंत भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पोहोचले. याची फलश्रुती म्हणजे भाजपला देशात स्पष्ट बहुमत मिळाले. अबकी बार मोदी सरकारचा नारा शहरात व ग्रामीण भागातील गल्लीबोळात गुंजला. याच मोदींनी देशवासीयांना अच्छे दिन आनेवाले है.. असे सांगितल्यामुळे आता मतदार आपल्याला चांगले दिवस येतील याकडे आस लावून बसले आहेत. एनडीएने लोकसभेची २0१४ ची निवडणुक गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ग्रामीण भागातील जनतेला सुखाचे स्वप्न दाखविल्यामुळे देशात भाजपची सरकार आली. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी विकास कामांना खीळ बसविलेल्या नेत्यांना घरी पाठवून भाजपच्या नाना पटोलेंना दीड लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी केले. सतत १0 वर्ष केंद्रीय मंत्रीपद सांभाळणारे मंत्री प्रफुल्ल पटेलांची जादू यावेळी चालली नाही. देशात मोदींची लहर होतीच मात्र गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले नसतानाही नाना पटोले यांनी लोकांची मने जिंकून लाखो मतांनी विजयी मिळवला. सकाळ पासून मतगणना सुरू होताच गोंदिया जिल्ह्यात व शहरात जल्लोष दिसून येत होता. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या नाना पटोले यांनी दीड लाखापेक्षा अधिक मतानी विजय मिळविला. या विजयामुळे शहराच्या गल्लोगल्लीत हर..मोदी, घरघर..नाना अशी धून गुंजवित भाजपचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक झेंडे घेऊन फिरताना दिसले. शहराच्या गोरेलाल चौकातील ठाटबाट या हॉटेलसमोर ढोल तासे वाजवीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजप कार्यालयासमोरही फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी व गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले हे दोघे सामान्य माणसे यामुळे सामान्य माणसांचा कल यांच्याकडे होता. चहा टपरीवाल्यालाही नमो नमोची जादू भावली अन् प्रत्येकाच्या तोंडावर नमोला पंतप्रधान करायचे आहे, असेच त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होते. निकाल सुरू असताना नाना पटोले आघाडीवर असल्याची वार्ता कानी पडताच अनेक नागरिकांनी मोदी सरकार व आपला उमेदवार असलेल्या नानाच्या सर्मथनात आपापल्या पध्दतीने आनंद व्यक्त केला. शहरातील अनेक व्यापार्यांनी आपल्या दुकानाच्या स्टेच्युला भाजपच्या रंगाचा दुपट्टा घालून दिला. कुणी नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला, कुणी सायकलवर भाजपाचा झेंडा लावून शहरात फेरफटका मारत होता. तर कुणी ढोल तासे वाजवून फटाक्यांची आतसबाजी करीत होता. अबकी बार आई मोदी सरकार.., मोदी को पीएम बनाना है, अच्छे दिन आनेवाले है हे वाक्य जोष भरणार्या भीमनगरातील सेवकराम रामटेकर या वृध्दाचे होते. सेवकरामने भाजपच्या कमळाचे चिन्ह असलेली टी-शर्ट परिधान करून दोन हातात दोन भाजपचे झेंडे घेऊन शहरात दिवसभर त्याने ‘अच्छे दिन आनेवाले है’चा पाढा गाईला. मोदी सरकार स्थापन होत असल्याने गोंदिया/भंडारा लोकसभा क्षेत्रातील मतदारांना चांगल्या दिवसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.