पाणी व शौचालयाच्या सोयीत गोंदिया अव्वल

By Admin | Updated: July 1, 2015 02:10 IST2015-07-01T02:10:33+5:302015-07-01T02:10:33+5:30

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने शाळेत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत .....

Gondiya tops with water and toilets | पाणी व शौचालयाच्या सोयीत गोंदिया अव्वल

पाणी व शौचालयाच्या सोयीत गोंदिया अव्वल

सहा शाळांमध्ये समस्या : कार्यकारी अभियंत्याची निवड
नरेश रहिले गोंदिया
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने शाळेत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालय बांधकाम केले आहे. राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे मुल्यमापन केल्यावर गोंदिया जिल्हा सर्वात आधी शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करणारा जिल्हा म्हणून पुढे आला आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १०७० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची व शौचालयाची सोय उपलब्ध झाली आहे.
आमगाव तालुक्यात ११६ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ८० शाळांमध्ये बोरवेल, २० शाळांमध्ये विहीर, १३ शाळांत नळ तर ३ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १३८ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ६७ शाळांमध्ये बोरवेल, ३६ शाळांमध्ये विहीर, ३० शाळांत नळ तर ५ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. देवरी तालुक्यात १४४ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ८६ शाळांमध्ये बोरवेल, ३ शाळांमध्ये विहीर, ३८ शाळांत नळ तर १८ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. गोंदिया तालुक्यात १८९ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून १३७ शाळांमध्ये बोरवेल, १४ शाळांमध्ये विहीर, २५ शाळांत नळ तर १२ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. गोरेगाव तालुक्यात १०९ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ७१ शाळांमध्ये बोरवेल, १८ शाळांमध्ये विहीर, १० शाळांत नळ तर १० शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ११५ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ७५ शाळांमध्ये बोरवेल, ८ शाळांमध्ये विहीर, २४ शाळांत नळ तर ८ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. सालेकसा तालुक्यात १२० शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ८० शाळांमध्ये बोरवेल, ५ शाळांमध्ये विहीर, २२ शाळांत नळ तर १३ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. तिरोडा तालुक्यात १३९ शाळा असून त्या शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळे शौचालय आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ९४ शाळांमध्ये बोरवेल, १९ शाळांमध्ये विहीर, १८ शाळांत नळ तर ८ शाळांमध्ये इतर सुविधा आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये ६९० बोरवेल, १२३ विहीर, १८० ठिकाणी नळ तर ७७ ठिकाणी इतर पिण्याच्या पाण्याच्या सोयी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालयाची शंभरटक्के व्यवस्था करणारा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे आल्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया व कार्यकारी अभियंता, सर्वशिक्षा अभियान या दोघांच्या नावे शासनाने प्रशस्तीपत्र दिले आहे.

Web Title: Gondiya tops with water and toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.