रेल्वे बजेटने गोंदियावासीयांचा अपेक्षाभंग !

By Admin | Updated: February 27, 2015 00:39 IST2015-02-27T00:39:35+5:302015-02-27T00:39:35+5:30

गुरूवारी सादर झालेल्या रेल्वे बजेटमध्ये सामान्य नागरिकांसाठई फारसे काही नसल्याने हे रेल्वे बजेट निराशाजनकच असल्याचे मत गोंदियातील मान्यवरांनी व्यक्त केले.

Gondiya residents disappoint with rail budget | रेल्वे बजेटने गोंदियावासीयांचा अपेक्षाभंग !

रेल्वे बजेटने गोंदियावासीयांचा अपेक्षाभंग !

गोंदिया : गुरूवारी सादर झालेल्या रेल्वे बजेटमध्ये सामान्य नागरिकांसाठई फारसे काही नसल्याने हे रेल्वे बजेट निराशाजनकच असल्याचे मत गोंदियातील मान्यवरांनी व्यक्त केले.
रेल्वेमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटनुसार, कोणत्याही श्रेणीचे प्रवाशी भाडे वाढविण्यात आले नाही. सर्व प्रवाशी गाड्यांमध्ये सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी सामान्य श्रेणीचे दोन अतिरीक्त कोच लागतील. स्मार्टफोन व मशिनच्या माध्यमातून प्रवाशांना अनारक्षित तिकीट पाच मिनिटात मिळण्याची सोय, त्यामुळे गाडी सुटण्याची भीती राहणार नाही. प्रवाशी रेल्वे गाडी येण्याची व सुटण्याची योग्य वेळ मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळेल. तक्रार करण्यासाठी १३८ व सुरक्षेसाठी १८२ टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक व महिला सुरक्षेसाठी प्रभावी प्रस्ताव ठेवण्यात आले. या काही बाबींचे गोंदियावासीयांनी स्वागत केले असले तरी ठोस काही पदरात पडले नाही.
२०० मॉडल स्मार्ट रेल्वे स्थानक बनतील. यात गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश राहण्याची शक्यता आहे. नागपूर-वर्धा दरम्यान तिसरी रेल्वे लाईन बनविण्याचे प्रस्ताव, त्यामुळे त्या क्षेत्रातील प्रवाशांना लाभ मिळेल. भोजन व व्हील चेयरसाठी आॅनलाईन सोय. रेल्वेच्या स्वच्छतेसाठी नवीन विभाग. रेल्वेद्वारे ‘किसान यात्रा’साठी विशेष व्यवस्था करण्यात येईल. पाच वर्षांत ८,५६,०२० कोटी रूपये खर्चातून रेल्वेला आत्मनिर्भर, सुरक्षित व लोकोपयोगी बनविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र सामान्य प्रवाशांसाठी या बजेटमध्ये विशेष असे काही नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
दोन ऐवजी आता महिन्यांऐवजी होवू शकेल आरक्षण. विविध स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा. गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थमध्ये वाढ. एसएमएसवर अनारक्षित तिकीट. गाड्यांची माहिती एसएमएसद्वारे. ४०० स्थानकांवर वायफाय सुविधा. सामान्य बोगीत चार्जिंगची सोय. विना गार्ड फाटकेवर लागणार अलार्म सोय आदींचा समावेश या रेल्वे बजेटमध्ये आहे. (प्रतिनिधी)


- नागरिकांचे मत
४राजेंद्र जैन : ‘अच्छे दिन’च्या नावावर मोदी सरकारच्या रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांच्या हातात खेळणे दिले. प्रवाशांना सुविधा तर मिळाली नाही, मात्र खेळणे खेळत प्रवासात ते आपल्या समस्या विसरू शकतात. आश्चर्य म्हणजे एकही नवीन गाडीची घोषणा करण्यात आली नाही. १० टक्के युरियाच्या दरात मात्र केलेली वाढ शेतकरीविरोधी आहे.
४नरेंद्र असाटी : सामान्य जनतेसाठी रेल्वे बजेटमध्ये नवीन काहीच नाही. सर्व श्रीमंतांसाठी आहे. पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढ, अंतर वाढविणे, डब्बे वाढविणे, एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल कोचची संख्या वाढविणे यासारखे सामान्य जनांसाठी अत्यंत आवश्यक असे रेल्वे बजेटमध्ये काही नाही. मेट्रो गाड्यांमुळे शहरातील वाहतुकीची व्यवस्था होईल. विकासाच्या नावावर घोषणा करण्यात आलेल्या बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, प्रीमियम ट्रेन यांच्यापेक्षा कमी दराच्या पॅसेंजर गाड्यांची अधिक गरज सामान्य जनतेला आहे.
४लक्ष्मीचंद रोचवानी : नवीन आरक्षण नितीनुसार आता प्रवासाची तारिख चार महिन्यापूर्वी ठरवावी लागेल. मात्र अचानक किंवा घाईगडबडीत प्रवास करणाऱ्यांसाठी काय? तत्काल आरक्षणसुद्धा सहज मिळत नाही.
४जयेश पटेल : आज आम्ही विदर्भ एक्सप्रेस, छत्तीसगड एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, गुजरात मेल गाड्यांची नावे घेवून गौरवान्वित होतो. आवक वाढविण्यासाठी ट्रेनच्या डब्ब्यांवर किंवा संपूर्ण ट्रेनमध्ये कोणत्याही एका कंपनीची जाहिरात लावून त्या गाडीला जाहिरातवाल्या कंपनीच्या नावे घोषणा करण्यात आली आहे. याच आधारावर रेल्वे स्थानकांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून हे निंदनीय आहे. कोणत्याही देशी किंवा विदेशी कंपनीच्या दबावात येवून भारताच्या नावातही बदल करण्यात येईल का? पुलांवर रॅम्प बनविणे आवश्यक आहे.
४यशपाल डोंगरे : नेत्यांसाठी आश्वासन निभवणे आवश्यक नसते हे या बजेटवरून दिसते. हे बजेट म्हणजे रात्रीच्या स्वप्नाप्रमाणे आहे. जनतेला चांगले स्वप्न दाखविणे सोपे आहे, परंतु पूर्ण करण्याची राजकीय इच्छा वेगळीच असते. दुसऱ्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र प्रत्येक बाबतीच अग्रणी आहे. परंतु राज्यासाठी ज्या सुविधा बजेटमध्ये असायला हव्या होत्या, त्या नाहीत.

Web Title: Gondiya residents disappoint with rail budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.