गोंदिया जेसीजकडून रेल्वे स्थानकावर अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:42 IST2016-02-20T02:42:01+5:302016-02-20T02:42:01+5:30

गोंदिया शहरातील युवती व महिलांनी जेसीआय गोंदिया कृती या संस्थेच्या मदतीने जेसी पुरुषोत्तम मोदी,

Gondiya Jesse janseed at the railway station | गोंदिया जेसीजकडून रेल्वे स्थानकावर अन्नदान

गोंदिया जेसीजकडून रेल्वे स्थानकावर अन्नदान

नागरिकांना आवाहन : नियमित कार्यक्रम
गोंदिया : गोंदिया शहरातील युवती व महिलांनी जेसीआय गोंदिया कृती या संस्थेच्या मदतीने जेसी पुरुषोत्तम मोदी, संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. कीर्ती आहुजा यांच्या मार्गदर्शनात गोरगरीबांना अन्नदान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यात नियमितपणे रेल्वे स्थानकासह इतर काही ठिकाणी अन्नदान केले जात आहे.
जेसी डॉ.चांदणी अग्रवाल यांच्या नेतृत्वात अन्नदान कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे यात सहकार्य करण्याचे आवाहन गोंदियावासीयांना करण्यात आले आणि त्यात नागरिकांचाही सहभाग मिळत आहे. यात आधी भीमनगर निवासी मोना कटारे यांनी अन्नदान कले. त्यात रिया गाजीपुरे, श्रुती सिंघानिया, डॉ.नितेश बाजपेई, उमेश दमाते, संदीप खांडेकर, जयेश शर्मा, गोविंद तोलानी यांनी जाऊन रेल्वे स्थानकावर गोरगरीब आणि गरजूंना अन्नदान केले.
ज्या लोकांना अशा पद्धतीने अन्नदान करायचे आहे त्यांनी डॉ. चांदणी अग्रवाल, कीर्ती अहुजा, भूमी वतवानी, सारिका ढोमने, मंजू हलकरे, गुंजा वतवानी, श्रुती सिंघानिया, रिया गाजीपूर, उमेश दमाहे डॉ.नितेश बाजपेई आणि पुरुषोत्तम मोदी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gondiya Jesse janseed at the railway station