गोंदियाची तेजश्री जिल्ह्यात प्रथम
By Admin | Updated: May 28, 2015 01:20 IST2015-05-28T01:20:42+5:302015-05-28T01:20:42+5:30
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

गोंदियाची तेजश्री जिल्ह्यात प्रथम
९३.९४ टक्के निकाल : विज्ञान शाखेतून हरेंद्रजित अरोरा प्रथम तर मीत हरिणखेडे द्वितीय
गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोंदियातील विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची तेजश्री बालपांडे हिने ९६.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ प्रोग्रेसिव्ह कनिष्ठ महाविद्यालयाचा हरेंद्रजित कलवंतसिंग अरोरा याने ९६.१५ टक्के गुण घेत दुसरा तर महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाची मीत हरिणखेडे हिने ९५.२३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ५८२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. ५९१६ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे. कला शाखेतून ९१.६५ टक्के विद्यार्थी, वाणिज्य शाखेतूून ९०.६८ टक्के आणि व्होकेशनलमधून ८६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३० मुले व ९ हजार ६९० मुलींनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८२३ मुले आणि ९ हजार २३३ मुली उत्तीर्ण झाल्या. यावर्षीही पुन्हा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालात मुलांपेक्षा मुलीच श्रेष्ठ ठरल्या आहेत.
विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा चार शाखांमधून १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८ हजार ४३१ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, ९ हजार ४३० विद्यार्थी कला शाखेचे, ८९१ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे तर ४६८ विद्यार्थी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे होते.
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या , अर्थात १०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यात २५ शाळा आहेत. गेल्यावर्षी २१ शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के होता. त्यात शहरीपेक्षा ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. देवरी तालुक्यात हा फरक सर्वात जास्त आहे. तिथे ८७.५२ टक्के मुले आणि ९३.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी ९२.५८ टक्के मुले अणि ९५.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
आजी-आजोबांच्या पाठबळातून मिळविले तेजश्रीने यश
तेजश्री ही तशी भंडारा जिल्ह्यातील तुमसरची. तिचे आई-वडिल तिथेच राहतात. एका प्रतिष्ठानात खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या वडिलांपेक्षा तेजश्रीवर तिच्या आजी-आजोबांचेच (आईचे बाबा) संस्कार जास्त आहेत. नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेले आजोबा नरेंद्र आगाशे यांच्यासह आई व तिच्या मावशीने तिला आई-वडिलांप्रमाणे प्रेम देऊन मानसिक पाठबळ दिले. अगदी ती दीड वर्षाची असतानापासूनच तेजश्री आजी-आजोबांसोबत गोंदियात राहते. तल्लख बुद्धिमत्तेसह, जिद्द आणि चिकाटी ठेवून तिने दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळीही तिने ९७ टक्के गुणांचे लक्ष्य निर्धारित करीत ९६.६१ टक्के गुण पटकावले. तिच्या या यशात मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.रायकवार यांचे वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनाचाही वाटा असल्याचे तिने सांगतिले. स्वअध्ययनावर जोर देत टार्गेट बेस अभ्यास करून आपण हे यश मिळविल्याचे ती सांगते. देशातील ‘टॉप टेन’ कॉमर्स कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून बी.कॉ., एम.बी.ए. करणार, तिथे प्रवेश न मिळाल्यास कोणत्याही कॉलेजमधून बी.कॉम. करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे तेजश्रीने सांगितले.
गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोंदियातील विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची तेजश्री बालपांडे हिने ९६.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ प्रोग्रेसिव्ह कनिष्ठ महाविद्यालयाचा हरेंद्रजित कलवंतसिंग अरोरा याने ९६.१५ टक्के गुण घेत दुसरा तर महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाची मीत हरिणखेडे हिने ९५.२३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ५८२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. ५९१६ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे. कला शाखेतून ९१.६५ टक्के विद्यार्थी, वाणिज्य शाखेतूून ९०.६८ टक्के आणि व्होकेशनलमधून ८६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३० मुले व ९ हजार ६९० मुलींनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८२३ मुले आणि ९ हजार २३३ मुली उत्तीर्ण झाल्या. यावर्षीही पुन्हा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालात मुलांपेक्षा मुलीच श्रेष्ठ ठरल्या आहेत.
विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा चार शाखांमधून १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८ हजार ४३१ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, ९ हजार ४३० विद्यार्थी कला शाखेचे, ८९१ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे तर ४६८ विद्यार्थी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे होते.
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या , अर्थात १०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यात २५ शाळा आहेत. गेल्यावर्षी २१ शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के होता. त्यात शहरीपेक्षा ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. देवरी तालुक्यात हा फरक सर्वात जास्त आहे. तिथे ८७.५२ टक्के मुले आणि ९३.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी ९२.५८ टक्के मुले अणि ९५.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
१) शांताबेन मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज, गोंदिया
२) विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया
३) मनोहरभाई पटेल सैनिकी शाळा गोंदिया
४) प्रोग्रेसिव्ह हायस्कूल क.महाविद्यालय गोंदिया
५) फुंडे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फुचलूर
६) संजय जयरामदास क.महाविद्यालय ठाणा
७) मिलिंद कला कनिष्ठ महाविद्यालय बाकटी ता.अर्जुनी मोर.
८) श्रीमती भगिरथीबाई डोंगरवार क.महाविद्यालय नवेगावबांध
९) जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगर
१०) आदिवासी विकास क.महाविद्यालय झासीनगर, ता.अर्जुनी मोर.
११) श्री सम्राट आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, अर्जुनी मोर
१२) शासकीय मुलींची आश्रमशाळा बोरगाव (बाजार)
१३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर क.महाविद्यालय डोंगरगाव ता.देवरी
१४) प्रिदर्शिनी कला महाविद्यालय घुमर्रा
१५) किनसान मिशन कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव
१६) लोकसेवा क.महाविद्यालय, कोसमतोंडी
१७) स्व.बनारसीदास अग्रवाल क.महाविद्याल, सडक अर्जुनी
१८) पार्थ कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी
१९) स्व.हिरालाल जैन कनिष्ठ महाविद्यालय खोबा, ता.सडक अर्जुनी
२०) लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय कोकणा-जमी
२१) जीईएस कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सडक-अर्जुनी
२२) शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बिजेपार
२३) शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालय कोटजंभुरा, ता.सालेकसा
२४) लालसिंह मच्छीरके कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध
२५) एस.एन. विज्ञान महाविद्यालय सरांडी