छत्तीसगडच्या कालव्यात गोंदियाच्या युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 5, 2015 01:21 IST2015-04-05T01:21:53+5:302015-04-05T01:21:53+5:30

संबलपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गोंदियातील चार पैकी एका तरूणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Gondia's youth death in Chhattisgarh canal | छत्तीसगडच्या कालव्यात गोंदियाच्या युवकाचा मृत्यू

छत्तीसगडच्या कालव्यात गोंदियाच्या युवकाचा मृत्यू

गोंदिया : संबलपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गोंदियातील चार पैकी एका तरूणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्या तरूणाचा मृतदेह त्याच्या सोबत्यांनी गोंदियात आणल्यावर त्याच्या नातेवाईकांनी सोबत असलेल्या मित्रांवर घातपात केल्याच्या आरोप करीत आपला असंतोष त्या वाहनावर काढला. वाहनाची तोडफोड करण्यात आली.
ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली. राजा उर्फ इमलीयाज दिलावर खान (२९) रा. बाजपायी वॉर्ड गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे. गोंदियाच्या मालवीय वॉर्डातील राजा अगडे, गोलू व इतर एक अश्या तिघांसोबत राजा संभलपूर येथे देवदर्शनासाठी एमएच ३५ पी २८१३ या वाहनाने गेले होते. देवदर्शनावरून परतताना ते आंघोळ करण्यासाठी रायपूर ते संभलपूर दरम्यान असलेल्या कालव्यावर थांबले.
कालव्यात आंघोळ करताना राजाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी त्याच्या मित्रांनी तिथे न करता त्याचा मृतदेह सरळ गोंदियाला आणण्यात आला.
मृतदेहाची गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणी करीत असताना मृताच्या नातेवाईकांनी सदर घातपात असल्याचा आरोप करीत ज्या वाहनाने ते प्रवासात गेले होते त्या वाहनाची तोडफोड केली. यासंदर्भात तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक देवाजी नरोटे करीत आहेत.
घातपात असल्याच्या संशयावरून केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात कारची तोडफोड करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये बबलू, साहिल, अनवर खा व इतर ४ अश्या सात जणांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gondia's youth death in Chhattisgarh canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.