यू-डायसमध्ये गोंदिया पुन्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:29+5:30
जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाही पहिला ठरला आहे.

यू-डायसमध्ये गोंदिया पुन्हा अव्वल
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाही पहिला ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने १६६३ शाळांची संपूर्ण माहिती यशस्वीरित्या भरून सलग तिसऱ्यावर्षीही प्रथम येणाच्या मान पटकाविला आहे.
संपूर्ण राज्यात संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने भारत यू-डायस प्लस या ऑनलाईन पद्धतीद्वारे भरण्यात येत आहे. यात गोंदिया जिल्हा दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील एकुण १ हजार ६६३ शाळांची माहिती यू-डायस प्रणालीद्वारे भरण्यात आलेली आहे.
याचा तालुकानिहाय विचार केल्यास, आमगाव १५५ शाळा, अर्जुनी-मोरगाव २०८, देवरी २०७, गोंदिया ४१५, गोरेगाव १५८, सडक-अर्जुनी १६७, सालेकसा १५२, तिरोडा २०२ अश्या १६६३ शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे भरण्यात आली आहे.
विविध अभियानात अव्वल स्थान कायम
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असला तरी शिक्षणाच्या प्रगतील प्रगत महाराष्ट्र घडविण्यात गोंदिया जिल्हा कुठेही मागे नाही. ज्ञान रचनावाद असो, प्रगतशिल शाळा असो, असर सर्वेक्षण असो, वाचन कट्टा असो किंवा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच्या माध्यमातून राबविण्यात कोणतेही उपक्रम असोत हे राबविण्यात गोंदिया जिल्हा मागे राहात नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल व तज्ज्ञ शिक्षकांच्या मेहनतीमुळे गोंदिया जिल्हा बहुतांश बाबींमध्ये राज्यात अव्वल स्थानावर आहे.
शंभर टक्के काम करणारा जिल्हा
आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शाळांची माहिती भरण्यात जिल्हा राज्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्याच क्रमांकावर राहीला. जिल्ह्याने शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. यू-डायस प्लस फॉर्मद्वारे ३० डिसेंबर २०१९ ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या कालावधीत गोंदिया जिल्ह्याने आपले काम पूर्ण केले आहे. या मुदतीपर्यंत अजूनही अनेक जिल्ह्यातील कामे पूर्ण झाली नाहीत.