गोंदिया: कोहमारा महामार्गावर भंडगाजवळ भरधाव कार झाडाला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: May 19, 2023 13:06 IST2023-05-19T13:05:43+5:302023-05-19T13:06:51+5:30
गोरेगाव - कोहमारा महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली यात ७० वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला आहे.

गोंदिया: कोहमारा महामार्गावर भंडगाजवळ भरधाव कार झाडाला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू
गोंदिया: गोरेगाव - कोहमारा महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली यात ७० वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला आहे.
गोंदिया शहरातील ७० वर्षीय माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीचंद रोहडा हे आपल्या कारने आज दि. १९ मे रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता गोंदियावरून कोहमाराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान भडंगा गावाजवळ जानाटोला पेट्रोल पंप च्या पुढे त्यांची कार अनियंत्रित झाल्याने झाडाला धडकली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.