गोंदिया पं.स.चे आरक्षण जाहीर

By Admin | Updated: April 8, 2015 01:26 IST2015-04-08T01:26:56+5:302015-04-08T01:26:56+5:30

पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गोंदिया तालुक्यातील २८ पंचायत समिती क्षेत्राचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले आहे.

Gondia Panchayat Reservation | गोंदिया पं.स.चे आरक्षण जाहीर

गोंदिया पं.स.चे आरक्षण जाहीर

गोंदिया : पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गोंदिया तालुक्यातील २८ पंचायत समिती क्षेत्राचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. काहींना त्यांच्या जागी दुसऱ्याचे आरक्षण आल्याने निवडणुक लढविण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात उडी घ्यावी लागणार आहे.
बिरसोला या पंचायत समिती क्षेत्रात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ही जागा राखीव करण्यात आली. यात बिरसोला, भाद्याटोला, कासा, ब्राम्हणटोला, पुजारीटोला, जिरूटोला, चंगेरा, सेरकाटोला व कोरणी ह्या ग्राम पंचायत येत आहेत. बनाथर हे क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. यात सतोना, बनाथर, जगनटोला, कोचेवाही, मरारटोला, धामनगाव, वडेगाव ह्या ग्राम पंचायत आहेत. पांजरा या पंचायत समिती क्षेत्रात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ही जागा राखीव करण्यात आली. यात पांजरा, कटंगटोला, छिपीया, झिलमीली व लंबाटोला ह्या ग्राम पंचायतींचा समावेश आहे.
रजेगाव या पंचायत समिती क्षेत्रात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ही जागा राखीव करण्यात आली. यात रजेगाव, परसवाडा, चिरामनटोला, सिरपूर,मोगर्रा, भादुटोला व चारगाव या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. काटी या पंचायत समिती क्षेत्र सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात काटी, मरारटोला, कन्हारटोला, बाजारटोला, बघोली, कलारटोला या ग्राम पंचायतींचा समावेश आहे.
दासगाव खुर्द या पंचायत समिती क्षेत्र सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात दासगाव खु., दासगाव बु., डांगोर्ली, तेढवा या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. नवेगाव हे पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात किन्ही, निलागोंदी, सोनपुरी, पोलाटोला, नवेगाव, देवरी, सोनबिहरी, बलमाटोला या ग्राम पंचायतचा समावेश आहे. धापेवाडा या पंचायत समिती क्षेत्र नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात धापेवाडा, मुर्दाळा, महालगाव व लोधीटोला या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. पांढराबोडी या पंचायत समिती क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात पांढराबोडी, लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, बिरसी (दा.), रायपूर या ग्राम पंचायतींचा समावेश करण्यात आला. घिवारी या पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात गिरोला, पिपरटोला, माकडी, उमरी, निलज, सिवनी, घिवारी, गोंडीटोला, लोधीटोला या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. गर्रा खुर्द हे पंचायत समिती क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात रावणवाडी, गोंडीटोला, गर्रा खु. गर्रा बु., मुरपार, अर्जुनी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. कामठा हे पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात कामठा, बिरसी, खातीया ग्राम पंचायतूंचा समावेश आहे. सावरी हे पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात सावरी, हलबीटोला, लोधीटोला, अंभोरा, बटाणा या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. नागरा सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. यात नागरा, चांदणीटोला, कटंगटोला, नवेगाव, नवाटोला, जब्बारटोला या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. रतनारा पं.स.क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. रतनारा, भानपूर, जरताळ, सेजगाव, काहेका, सायटोला या गावांचा समावेश आहे. दवनीवाडा हे पंचायत समिती क्षेत्र नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात दवनीवाडा, वळद, कारूटोला, झाडूटोला, खातीटोला, देवऊटोला, बिजाईटोला, पिपरटोला, पार्डीबांध या गावांचा समावेश आहे.
एकोडी हे क्षेत्र नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात एकोडी, रामपूरी, दांडेगाव, धामनेवाडा या गावांचा समावेश आहे. गंगाझरी हे पंचायत समिती क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात गंगाझरी, टिकायतपूर, जुनेवानी, संग्रामपूर, मजितपूर, सहेसपूर, खळबंदा, खर्रा (पां), ओझाटोला, पांगडी या गावांचा समावेश आहे. डोंगरगाव हे पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात डोंगरगाव, किडंगीपार, फत्तेपूर, मुंडीपार, हिवरा, भागवतटोला, ढाकणी या गावांचा समावेश आहे. पिंडकेपार हे पंचायत समिती क्षेत्र अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात पिंडकेपार, पिंडकेपारटोला, नगपूरा मुर्री, लोधीटोला या गावांचा समावेश आहे. कुडवा पं.स.क्षेत्र सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात कुडवा या ग्रा पंचायतीचा समावेश आहे. कटंगीकला क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. यात कटंगीकला, बरबसपूरा, टेमणी या गावांचा समावेश आहे. आसोली सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून यात आसोली, मुंडीपार, नवरगावकला, इर्री या गावांचा समावेश आहे. दत्तोरा हे पंचायत समिती क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात नवरगाव खु., पोवारीटोला, दागोटोला, गुदमा, मोरवाही, दत्तोरा या गावांचा समावेश आहे. खमारी हे पंचायत समिती क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. यात चुलोद, खमारी या गावांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gondia Panchayat Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.