गोंदिया दहशतीत, बाजारपेठ ठप्प

By Admin | Updated: March 19, 2015 01:13 IST2015-03-19T01:13:51+5:302015-03-19T01:13:51+5:30

गोंदियाचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेता पंकज यादव यांच्यावर प्राणहातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक ...

Gondia horror, market jam | गोंदिया दहशतीत, बाजारपेठ ठप्प

गोंदिया दहशतीत, बाजारपेठ ठप्प

गोंदिया : गोंदियाचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेता पंकज यादव यांच्यावर प्राणहातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून यादव समर्थक गटातील १२५ जणांनी बुधवारी सकाळी ९ वाजता शहर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यांनी काचेच्या बाटल्यांनी एका पोलीस शिपायाला मारहाण केली. त्यामुळे गोंदिया शहरात दिवसभर तणाव होता. दरम्यान या दहशतीच्या वातावरणात बाजारपेठही दिवसभर बंद होती.
यादव यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजता दोन अज्ञात तरूणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी यादव गटातील १२५ जणांनी बुधवारच्या सकाळी ९ वाजतादरम्यान गोंदिया शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी काही युवकांनी शहर पोलीस ठाण्याच्या समोर लागलेल्या काचांनी तोडफोड केली. तसेच तेथे ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी ओमप्रकाश हेमंत रहिले (ब.नॅ ७९८ ) यांना बॉटलने मारहाण केली. या प्रकरणावरून गोंदिया शहरात दिवसभर दहशतीचे वातावरण होते. व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने बंद करण्यात आली होती. दिवसभर ही दुकाने बंद होती. विशेष बहुतांश शाळांनीही बुधवारी सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आधीच सुटी जाहीर केली.
शहरात या घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी शहरात आले असता त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gondia horror, market jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.