शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गोंदिया; बालक सर्पदंशप्रकरणी डॉक्टरांना सोडवण्याकरिता नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:54 AM

सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुवैदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेतले. यामुळे नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.

ठळक मुद्देसर्पदंशाने मृत बालकास जिवंत करण्याचा केला होता दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुवैदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष असून पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांना त्वरीत सोडण्यात यावे. या मागणीला घेवून नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. टायरची जाळपोळ केली. त्यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाचा सर्प दंशाने रविवारी (दि.१४) मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन तीन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहचले. मात्र एकदा मृत्यू झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉ.लिल्हारे व दोन जणांना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना घोटी येथे पोहचता आले नाही. पोलिसांनी डॉ.लिल्हारे यांना घोटी येथे पोहचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे गोरेगाव येथे तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखत अतिरिक्त पोलीस ताफा मागविण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन