गोंदिया एफएमची क्षमता वाढणार

By Admin | Updated: June 4, 2015 00:52 IST2015-06-04T00:52:45+5:302015-06-04T00:52:45+5:30

आपले मनपसंत गाणे ऐकण्याची हौस भागविणारे विविध एफएम स्टेशन आजघडीला तयार झाले आहेत. प्रत्येकच शहराचे त्यांचे एफएम स्टेशन तयार होत असून त्यानुसार ...

Gondia FM will increase capacity | गोंदिया एफएमची क्षमता वाढणार

गोंदिया एफएमची क्षमता वाढणार

एक किलोवॅट होणार : कव्हरेज क्षेत्रातही होणार वाढ
गोंदिया : आपले मनपसंत गाणे ऐकण्याची हौस भागविणारे विविध एफएम स्टेशन आजघडीला तयार झाले आहेत. प्रत्येकच शहराचे त्यांचे एफएम स्टेशन तयार होत असून त्यानुसार गोंदिया एफएम सन २०१३ पासून सुरू करण्यात आले आहे. सध्या १०० वॉट क्षमता असलेल्या या ‘एफएम’ची आता क्षमता वाढवून एक किलोवॅट केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्थातच एफएमच्या कव्हरेज क्षेत्रात वाढ होणार असून दूरवरच्या संगीत शौकिनांना त्याचा लाभ होणार आहे.
येथील आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून १५ फेब्रुवारी २०१३ पासून गोंदिया एफएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. एफएम म्हटले की, आपल्या पसंतीची गाणे सांगितल्यास संबंधीत स्टेशनकडून तुमच्या फरमाईशचे गाणे ऐकविले जाते. यासाठी ठरवून दिलेल्या क्रमांकाचे बँड सेट करून या सुविधेचा लाभ घेता येतो. आता तर मोबाईलच्या माध्यमातूनही युवाच काय वयोवृद्धही आपली आवड सांगून मनपसंत गाणे ऐकताना दिसत आहेत. मोठ्या शहरांतील एफएमची ही सुविधा गोंदियाच्या स्टेशनकडून सुरू करण्यात आली असून गोंदियावासीही एफएमचा लाभ घेत आहेत.
मात्र आजघडीला १०० वॅट क्षमतेवर गोंदिया एफएम चालविले जात आहे. त्यामुळे याचे कव्हरेज क्षेत्र सुमारे सहा ते सात किमी अंतराचे आहे. या रेंजमध्ये असलेल्यांनाच एफएमवर गाणे ऐकता येत आहेत. कमी क्षमता असल्याने नागरिकांना यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे गोंदिया एफएमची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेत गोंदिया एफएमची क्षमता आता १ किलोवॅट करण्यात येणार आहे. ही क्षमता केव्हा वाढणार याचा कालावधी सांगता येणार नसल्याचे वरिष्ठ तंत्रज्ञ जी.झेड. कनोजे यांनी सांगीतले. मात्र ही क्षमता वाढविल्यानंतर कव्हरेज क्षेत्रात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gondia FM will increase capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.