शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मात्र काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

ठळक मुद्दे२२ दिवसांत नवीन रु ग्णाची नोंद नाही । २३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने देशातील ‘लॉकडाऊन’मध्ये पुन्हा दोन आठवड्यांनी वाढ केली असून देशातील विविध जिल्ह्यांचे तीन झोनमध्ये विभाजन केले आहे. यात गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मात्र काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.जिल्ह्यात मागील २२ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये केला आहे. राज्यात केवळ सहा जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये असून त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस व अन्य विभागांनी केलेले संयुक्त पॉझिटिव्ह प्रयत्न आणि जिल्हावासीयांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतलेली खबरदारी या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.जिल्ह्यात २६ मार्च रोजी पहिला कोरोना बाधीत रु ग्ण आढळल्यानंतर याचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या याचे देखील हे फलित आहे. यासर्व गोष्टींमुळेच तब्बल २ महिन्यानंतर जिल्ह्यातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे व्यावसायीकांसह यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आतापर्यंत २४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.३७ व्यक्ती शासकीय क्वारंटाईन कक्षातजिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ३७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे नऊ, ग्राम चांदोरी येथे १२, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे नऊ, ग्राम डव्वा येथील समाज कल्याण निवासी शाळेत सहा तर ग्राम बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ३७ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या