महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गोंदिया जिल्हा अधिवेशन
By Admin | Updated: December 23, 2015 02:28 IST2015-12-23T02:28:11+5:302015-12-23T02:28:11+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गोंदियाचे जिल्हा अधिवेशन अंजनाबाई कवडूजी झरारिया सभागृह तिरोडा येथे आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गोंदिया जिल्हा अधिवेशन
तिरोडा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गोंदियाचे जिल्हा अधिवेशन अंजनाबाई कवडूजी झरारिया सभागृह तिरोडा येथे आयोजित करण्यात आले. हे अधिवेशन राज्य कार्याध्यक्ष सुदाम काकपुडे यांचे अध्यक्षतेखाली आ. ना.गो. गाणार, प्रभारी शिक्षणाधिकारी अरूण फुंडे, अरूण पारधी, मुख्याध्यापक अरूण पालांदूरकर, राधेश्याम पंचबुध्दे, सतीश मंत्री प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
दुसऱ्या दिवसीचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, विभागीय उपाध्यक्ष नेतराम अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली, न.प. अध्यक्ष अजय गौर, आमदार ना.गो. गाणार, माजी आ.भजनदास वैद्य, डी.आर.गिरीपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
यावेळी शालेय स्थिती, समस्या व निराकारण यावर डॉ.उल्हास फाडके यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन बी.एन. सोनटक्के, प्रदीप मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन एम.एस. चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी ए.डी. असाटी, एच.एन. ठाकरे, यु.टी. पारधी, युवराज पारधी, टी.एम. मडावी, एस.बी. मिश्रा, यु.जी. शेंडे, एन.टी. नेरकर, माया वानखेडे, के.एस. साकुरे, आर.बी. भांडारकर, बी.यु. बिसेन, नंदु जनबंधू, वाय.एम. टेंभरे, एन.एस. चौधरी आदी शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)