शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गोंदियाच्या जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने दिली पीक कर्जफेडीस ३ महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:31 PM

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे संचालक मंडळाचा पुढाकारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा कजार्ची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे अशक्य आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण, त्यांना व्याजाचा अतिरिक्त भूर्दंड बसू नये यासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाने पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी आणि जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे कठीण होते. तर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही ३१ मार्च असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) मोबाईलवरुन संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जफेडीस ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजेंद्र जैन यांनी यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल आणि पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सुध्दा यासंदर्भात चर्चा करुन मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेतला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.१११ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही अंत्यत सोपी असल्याने शेतकऱ्यांना ही बँक आपली बँक वाटते.त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी याच बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. खरीप हंगामात जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकऱ्यांनी एकूण १११ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. तसेच खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाच्या तुलनेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर होती.जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासाकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण लक्षात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी (दि.३०) पीक कर्जाची परतफेड करण्यास ३ महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरपीक कर्जार्ची उचल केलेल्या शेतकºयांना त्याची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत बँकानी दिली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. वेळेत कर्जाची परफेड केली नाही तर व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागेल तसेच शासनाच्या योजनेचा सुध्दा लाभ मिळणार नाही ही चिंता मागील आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना सतावित होती. मात्र जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची ही मोठी चिंता दूर झाली आहे.२२ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करण्याची अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात संचालक मंडळाने संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जाची परतफेड करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितार्थ घेतला आहे.- राजेंद्र जैन, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी