शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखविणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 9:40 AM

इयत्ता सहाव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एका मुख्याध्यापकाने अश्लिल चित्रफीत दाखविल्याची घटना गुरूवारी (दि.२१) रात्री उशीरा तालुक्यातील घुमर्रा येथे उघडकीस आली.

ठळक मुद्देपालकांची पोलिसांत तक्रार गोरेगाव तालुक्यातल्या घुमर्रा येथील घटना

आॅनलाईन लोकमतगोरेगाव : इयत्ता सहाव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एका मुख्याध्यापकाने अश्लिल चित्रफीत दाखविल्याची घटना गुरूवारी (दि.२१) रात्री उशीरा तालुक्यातील घुमर्रा येथे उघडकीस आली. हा प्रकार विद्यार्थिनीच्या पालकांना कळताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून मुख्याध्यापका विरोधात पोलिसात तक्रार केली. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.जयेन्द्र रामाजी शहारे (५३) असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते तालुक्यातील घुमर्रा येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार सदर मुख्याध्यापकाने १९ डिसेंबरपासून शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित मोबाईल व कॅम्प्युटरवर दाखविणे सुरु केल्याने विद्यार्थिनीमध्ये याची चर्चा होती. यातील काही विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्यानंतर काही पालकांनी गुरूवारी (दि.२१) रोजी सकाळी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला याचा जाब विचारला. दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत शाळ बंद करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शाळेच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक एस. आर.नारनवरे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचताच गावकरी आक्रमक झाल्याने डुग्गीपार व आमगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. नारनवरे यांनी मोठ्या शिताफीने मुख्याध्यापकाला लोकांच्या तावडीतून शाळेबाहेर काढून अटक केली. गुरूवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी योगराज बळीराम चौधरी (६३) रा. घुमर्रा यांनी आरोपी जयेन्द्र रामाजी शहारे (५३) या मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन अश्लिल चित्रफित दाखवून विनयभंग करणे भादंवि ३५४ (अ) ३, व लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ११ (३) १२ सहकलम अन्वये गुन्हा नोंद करुन मुख्याध्यापकाला अटक केली. या प्रकारणाचा तपास एस. आर. नारनवरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

गावकऱ्यांचे शाळा बंदचे आवाहनया प्रकरणाला घेऊन गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी शाळा बंद करण्याचे व विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहन केले.गावातील शाळा सुधार समिती, सरपंच, सदस्य व पोलीस पाटील यांनी संबंधित मुख्याध्यापकास त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.

मुख्याध्यापकावर निलबंनाची कारवाईघुमर्रा येथील गावकऱ्यांचा रोष आणि घटनेचे गांर्भिय ओळखत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्याध्यापकावर शुक्रवारी (दि.२२) रोजी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसातील जिल्ह्यातील ही दुसरी घटना होय. या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक