मनरेगात गोंदिया जिल्हा ‘अ’ श्रेणीतच

By Admin | Updated: March 22, 2017 01:23 IST2017-03-22T01:23:27+5:302017-03-22T01:23:27+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गोंदिया जिल्ह्याने सन २०१६-१७ मध्येही आपले ‘अ’ श्रेणीतील स्थान कायम ठेवले.

In Gondia District 'A' | मनरेगात गोंदिया जिल्हा ‘अ’ श्रेणीतच

मनरेगात गोंदिया जिल्हा ‘अ’ श्रेणीतच

१४३ कोटी खर्च : ६७.४१ लाख मनुष्यदिवस काम
नरेश रहिले   गोंदिया
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गोंदिया जिल्ह्याने सन २०१६-१७ मध्येही आपले ‘अ’ श्रेणीतील स्थान कायम ठेवले. १६ मार्चपर्यंत ६७ लाख ४१ हजार ६८२ मनुष्य दिवस काम उपलब्ध करवून देण्यात आले. ३१ मार्चपर्यंत ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्य दिवस काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. आतापर्यंत या कामावर १४३ कोटी २२ लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सन २०१६-१७ च्या वार्षिक मजूर अर्थसंकल्पानुसार ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्यदिवस काम उपलब्ध करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कामावर २५१ कोटी ८७ हजार रुपये खर्च करण्याचे ठरविले होते. एमआयएस अहवालानुसार १६ मार्चपर्यंत जिल्ह्यात ८५.६५ टक्के मनुष्य दिवस काम करण्यात आले. त्यावर ५६.८७ टक्के रक्कम खर्च करण्यात आली. आमगाव तालुक्याच्या मजूर अर्थसंकल्प ९ लाख ९४ हजार २६२ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यातील ६७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १२ हजार ६३९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ४० लाख ४४ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातील १००.८२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. देवरी तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १३ हजार ५० मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ४१ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. हे उद्दीष्ट ११७.२७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
गोंदिया तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ९० हजार ३२५ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ६९ लाख ४ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातील ९७.२३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. सालेकसा तालुक्याच्या मजूर अर्थसंकल्प ८ लाख ९२ हजार ९३२ मनुष्य दिवसाचा होता. त्यावर २८ कोटी ५७ लाख ३८ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यातील ९५.६० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
तिरोडा तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प १० लाख १ हजार १३९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३२ कोटी ३ लाख ६४ हजार रुपये खर्च करायचे होते. त्यातील ९६.११ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

सडक-अर्जुनी ‘सी’ ग्रेडमध्ये
सडक-अर्जुनी तालुक्यात ९ लाख ८३ हजार ८७९ मनुष्य दिवस कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु ४ लाख ८९ हजार ७२२ दिवस काम झाले आहे. त्यावर ३१ कोटी ४८ लाख ४१ हजार रूपयांमधून ११ कोटी ६ लाख ३९ हजार खर्च करण्यात आले. हा तालुका मग्रारोहयोच्या कामात माघारला आहे. आमगाव व गोरेगाव तालुका ‘बी’ ग्रेडमध्ये आहे.

गोरेगाव आणि सडक-अर्जुनी माघारले
गोरेगाव तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ८२ हजार ७१० मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ४४ लाख ६७ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद होती. त्यापैकी ६०.८६ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
सडक-अर्जुनी तालुक्याचा मजूर अर्थसंकल्प ९ लाख ८३ हजार ८७९ मनुष्य दिवसांचा होता. त्यावर ३१ कोटी ४८ लाख ४१ हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन असताना त्यातील ४९.७७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

Web Title: In Gondia District 'A'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.