गोंदियात सराफा व्यवसाय ठप्प
By Admin | Updated: March 5, 2016 02:00 IST2016-03-05T02:00:01+5:302016-03-05T02:00:01+5:30
एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी यासाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बंदला आता वाढ देण्यात आली आहे.

गोंदियात सराफा व्यवसाय ठप्प
सोमवारपर्यंत बंद : एक्साईज ड्युटी मागे घेण्याची मागणी
गोंदिया : एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी यासाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बंदला आता वाढ देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत (दि.४) असलेले हे बंद आता सोमवारपर्यंत (दि.७) सुरू राहणार असल्याची माहिती सराफा असोसिएशनकडून मिळाली आहे. सराफा व्यावसायिकांच्या या बंदमुळे मात्र सोने व्यवसायावर चांगलाच फरक पडला आहे.
अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर ीक टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. भारतात दागिन्यांचे ९० टक्के काम कारागिरांकडून केले जाते. त्यात आता दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक्साईज ड्यूटी लावण्यात आल्याने त्यांच्या नियमावलीचे पालन करणे अशक्य असून अशात सुमारे पाच कोटी लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे.
करिता शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. २, ३ व ४ मार्च पर्यंत हा बंद होता. या दरम्यान गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने गुरूवारी (दि.३) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वित्तमंत्री अरूण जेटली यांना निवेदन पाठविण्यात आले. तर आपल्या मागणीला घेऊन सराफा असोसिएशनचे मंत्र्यांसोबत बोलणे सुरू असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. करिता या बंद ला आता सोमवारपर्यंत (दि.७) वाढ देण्यात आली आहे.