गोंदिया-बल्लारशाह ट्रेनमधून दारू नेणाºयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:12 IST2017-08-28T22:11:47+5:302017-08-28T22:12:09+5:30
गोंगली रेल्वे स्थानकावर गोंदिया-बल्लारशाह (७८८२०) गाडीच्या केलेल्या तपासणीत रेल्वे सुरक्षा दलाने प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या.....

गोंदिया-बल्लारशाह ट्रेनमधून दारू नेणाºयास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंगली रेल्वे स्थानकावर गोंदिया-बल्लारशाह (७८८२०) गाडीच्या केलेल्या तपासणीत रेल्वे सुरक्षा दलाने प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या देशी दारूच्या ११८ बॉटल जप्त केल्या. ही कारवाई सोमवार (दि.२८) सकाळी ११.३० वाजता करण्यात आली.
सदर कारवाई सहायक मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात, प्रभारी निरीक्षक बी.एन. सिंह यांच्या नेतृत्वात, उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्रभारीअधिकारी आर.सी. कटरे, आरक्षक आर.डी. नानेकर, आरक्षक एल.एस. बघेल यांनी केली. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तपासणी करीत असताना कर्मचाºयांनी गोंगली रेल्वे स्थानकात गाडी (७८८२०) गोंदिया-बल्लारशाह गाडीची तपासणी केली. या वेळी एक व्यक्ती काळ्या रंगाची आपली वजनी बॅग लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची चौकशी केल्यावर त्याच्या बॅगमध्ये कपड्यांच्या खाली टायगर ब्राँडच्या देशी दारूच्या ११८ बाटल्या प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या आढळल्या. त्या बाटल्या तो चंद्रपूर येथील दारूबंदी क्षेत्रात घेवून जात असल्याचे त्याने कबूल केले.
निकूल विरेंद्रबराल (४२) रा. अष्टभुजा, झुलोना चौक, चंद्रपूर असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कलम ६५ (अ) (ई) मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.