गोंदिया व अर्जुनीत साडेपाच लाखांची चोरी
By Admin | Updated: May 22, 2014 01:13 IST2014-05-22T01:13:36+5:302014-05-22T01:13:36+5:30
अर्जुनी/मोरगाव व गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत अशा दोन ठिकाणी झालेल्या चोरींच्या घटनेत ५ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.

गोंदिया व अर्जुनीत साडेपाच लाखांची चोरी
गोंदिया : अर्जुनी/मोरगाव व गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत अशा दोन ठिकाणी झालेल्या चोरींच्या घटनेत ५ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. यासंदर्भात संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या गजानन कॉलनीतील फ्लॅट नंबर ६ येथील हरिश्चंद्र परसराम बारबुद्धे यांच्या घराच्या समोरील दाराचा कोंडा तोडून बेडरुममधील कपाटात ठेवलेल्या बॅगेतील दोन लाख ४८ हजार रुपये रोख व दोन लाख १0 हजारांचे दागिने असा चार लाख ६0 हजार ४00 रुपयांचा माल पळविण्यात आला. यात साडेपाच तोळे वजनाचे दोन मंगळसूत्र, एक तोळा वजनाचे दोन सोन्याचे कानातील रिंग, ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे डोरले व एक तोळा वजनाची सोन्याची साखळी, तसेच चार ग्रॅम वजनाचे एक जोडी कानातील टॉप्स, १६ नग स्टील नळ व दोन नग शॉवर व दोन हजार ४00 रुपये रोख असा एकूण ४ लाख ६0 हजार ४00 रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी पळविला. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या निमगाव येथील आहे. उद्धव अरविंद खोब्रागडे (७0) यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी ९३ हजारांचे दागिने पळविले. ते कुटुंबासह बाहेरगावी गेले असता ४ ते २0 मे दरम्यान त्यांच्या घरी सहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, १0 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, तीन ग्रॅम वजनाचे पदक व चार ग्रॅम वजनाच्या बिर्या असा ९३ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी पळविला. सदर घटनेसंदर्भात अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)