शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गोंदिया @ ४२.२, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

By कपिल केकत | Updated: June 6, 2023 18:13 IST

नवतपापेक्षा जास्त तापलेला : आता उकाडा झाला असह्य

गोंदिया : जून महिना सुरू झाला असून ७ जूनपासून मान्सून सुरू होतो व उन्हाळ्यापासून सुटका होते. मात्र, यंदा मान्सून लांबल्याने मे महिन्यापेक्षा जून महिना जास्त तापत आहे. मंगळवारी (दि.६) जिल्ह्याचा पारा ४२.२ अंशावर होता व गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. यामुळे आता जिल्हावासीयांना उकाडा असह्य झाला असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

अवकाळी पावसाने यंदा मार्च व एप्रिल महिन्यात ठाण मांडून जिल्हावासीयांचे दोन महिने गारव्यात काढून दिले. मात्र, जून महिना लागताच पाऊस पसार झाला व येथूनच उन्हाळा आपल्या रंगात आला. दिवसेंदिवस वाढत गेलेल्या तापमान व त्यात उकाड्यामुळे जिल्हावासीय पार भाजून निघाले आहेत. विशेष म्हणजे, नवतपामध्ये सर्वाधिक उन्हाळा तापतो, असे म्हटले जाते. मात्र, यंदा परिस्थिती विपरीत असून मे महिन्यात जेवढा उकाडा जाणवला नाही तेवढा उकाडा आता जाणवत आहे. जून लागूनही तापमानात घट होत नसून उलट उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे.

मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३ अंशावर होते व जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ४२.२ अंशाने गोंदिया जिल्हा होता. यावरून गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळ्याची अनुभूती येते. हवामान खात्याने मान्सून लांबल्याचे सांगितले असून त्यात सूर्य आग ओकत असल्याने जिल्हावासीय पार भाजून निघाले असून त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

गोंदिया जिल्हा आघाडीवर

- सूर्यदेव सध्या विदर्भावर आग ओकत असून त्यातही गोंदिया जिल्ह्यावर नाराज दिसत आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहत आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंश होते व जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. रविवारी गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्ह्याचे तापमान ४२.५ अंश होते व ते पहिल्या क्रमांकांवर होते. सोमवारीही तसेच ऊन तापले, तर मंगळवारी गोंदिया जिल्हा ४२.२ अंश तापमानाने परत एकदा दुसऱ्या क्रमांकावर होता.

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणTemperatureतापमानgondiya-acगोंदिया