विधानसभा क्षेत्राचा विकास हेच ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:25 IST2019-01-20T22:23:54+5:302019-01-20T22:25:10+5:30
आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले.

विधानसभा क्षेत्राचा विकास हेच ध्येय
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक विकासाची कामे केली, पुढेही करण्यात येतील जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. जनतेची सेवा हे मी माझे कर्तव्य समजतो. लोकांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देऊन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
येथील साखरीपाट सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने आयोजीत साखरीपाट बाबा महोत्सवाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात मंगळवारी (दि.१५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद बाल व महिला कल्याण सभापती लता दोनोडे, सुनील अग्रवाल, डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, डॉ. अजय उमाटे, समितीचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, समितीचे सचिव संतोष बोहरे, डॉ. विजय वानखेडे, ज्योती वानखेडे, प्रदीप अग्रवाल, संदीप अग्रवाल, प्रदीप चुटे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, धर्म आणि राजकारण यांचा संबंध असून प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्या धर्मानुसार वागावे. प्रत्येक धार्मीयांसोबत सहिष्णूतेचे वातावरण निर्माण होईल याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त करीत साकरीपाट बाबा मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊन तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सर्वप्रथम मंदिरातील देवी-देवताची पूजा-पाठ करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांना तसेच पतंग स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धकांना आमदार पुराम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी मेंढे व दोनोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. वानखेडे दाम्पत्यांचा मंदिराच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. सागर काटेखाये यांनी केले. आभार संतोष बोहरे यांनी मानले.