डीआरएमनंतर जीएमचा पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 02:02 IST2016-03-12T02:02:40+5:302016-03-12T02:02:40+5:30
दक्षीण, पूर्व, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा दौरा सहा दिवसानंतर होणार आहे. तत्पूर्वी नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांनी

डीआरएमनंतर जीएमचा पाहणी दौरा
तुमसर : दक्षीण, पूर्व, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा दौरा सहा दिवसानंतर होणार आहे. तत्पूर्वी नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांनी तुमसर रोड, गोबरवाही, डोंगरीबु. सुकली, डोंगरी बु. या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. स्वच्छतेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. रेल्वे प्रशासन रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे चिंतीत दिसत आहे.
नागपूर विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल व नागपूर विभागाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी बुधवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दूपारी १२ वाजताच्या सुमारास पोहोचले. संपूर्ण रेल्वे स्थानकांची त्यांनी पाहणी केली. नंतर त्यांचा ताफा गोबरवाही, डोंगरी बु. सुकली व तिरोडी येथे गेला. या रेल्वे स्थानकावर त्यांनी रेल्वे सदनिका परिसराला भेट देवून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. संपूर्ण रेल्वे स्थानकाला फेरफटका मारला.
१६ मार्चला तुमसर रोड, गोबरवाही डोंगरी बु. व तिरोडा या रेल्वे स्थानका व तुमसर ते तिरोडी पर्यंत रेल्वे ट्रॅकची पाहणी दक्षीण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पाहणी करणार आहेत. सिग्नलींग प्रणाली, मानव विरहीत क्रॉसींग, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी येथील नविन रेल्वे स्थानकांचे बांधकामाची पाहणी करणार असल्याचे समजते.
रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा असल्याने तत्पूर्वी विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी भेट देऊन पाहणी केल्याची माहिती आहे. स्वच्दतेकडे त्यांचा विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे संपुर्ण रेल्वे स्थानक व सदनिकांची स्वच्छता करण्यात आली आहे. रेल्वेचे प्रत्येक कार्यालय अपडेट करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आली असून रेल्वे सदनिकेअंतर्गत रस्ते नविन तयार करण्यात आले आहे.
रेल्वे अंदाजपत्रकापूर्वीच रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा निश्चित झाला होता, पंरतु तो काही कारणाने रद्द झाला. पुन्हा नविन तारिख येथे निश्चित करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मात्र या दौऱ्याचा धसका घेतल्याचे जाणवत आहे.
नागपूर-बिलासपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागपूर विभागाचे काही रेल्वे स्थानक बिलासपूर झोनला जोडण्याकरिता हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरु असल्याने या दौऱ्यात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा अभिप्रायही घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तिरोडी ते कटंगी दरम्यान सुमारे आठ किमी रेल्वे ट्रॅकचे काम मागील अनेक वर्षापाून रखडले आहे. तिरोडी भेटी दरम्यान या रेल्वे मार्गाची पाहणी रेल्वे महाव्यवस्थापक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर दक्षिण पूर्व व मध्य रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्थानक असून सुध्दा येथे विभागीय रेल्वे कार्यालय आहे. त्यामुळे नागपुर एक स्वतंत्र झोन म्हणून नव्याने होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौऱ्याला एक विशेष महत्व नक्कीच आहे. यावर मात्र रेल्वेचे अधिकारी बोलायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)