भगवान परशुरामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

By Admin | Updated: May 12, 2016 02:01 IST2016-05-12T02:01:31+5:302016-05-12T02:01:31+5:30

समग्र ब्राह्मण समाजाच्यावतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

Glory of Lord Parashuram | भगवान परशुरामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

भगवान परशुरामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

शोभायात्रेचे आयोजन : भाविकांना शीतपेयाचे वाटप
गोंदिया : समग्र ब्राह्मण समाजाच्यावतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. शोभायात्रेत ‘जय परशुराम’च्या जयघोषासह विविध देखाव्याने शहराचे भक्तीमय वातावरण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ७ मे रोजी हनुमान चालिसा पाठाने करण्यात आली. ८ मे रोजी सकाळी महिला मंडळ सभागृहात भगवान परशुरामची पूजा करुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने भगवान परशुरामचा जयघोष करीत रॅली भ्रमण केला. यावेळी मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता भगवान परशुरामची शोभायात्रा काढण्यात आली. महिला मंडळ सभागृहापासून सुरु झालेली शोभायात्रा हनुमान चौक, इंगळे चौक, काका चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरु चौक मार्गे महिला मंडळ सभागृहात शोभायात्रोचा समारोप करण्यात आला. शोभायात्रा भगवान परशुरामच्या रथासह वेगवेगळे देखावे, भजन मंडळ, ढोलताशांचा समावेश होता.
शहरात अनेक ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनेक धर्मप्रेमी संघटनांनी शरबत, आईस्क्रीम व मिठाईचे वाटप केले.
शोभायात्रेत शहरातील महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती, पंजाबी, मैथिली, दक्षिण भारतीय, बंगाली व उडिया ब्राह्मण बांधवांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Glory of Lord Parashuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.