शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:20+5:30

या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांवर कोणतीही अट घालू नये. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे बारावी व दहावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.

Give a quick waiver to farmers | शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने आठ हजार रूपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली. शेतकऱ्यांची थट्टा थांबवून सरकारने त्यांचे सरसकट कर्जमाफ करण्याची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व जिला समन्वयक पंकज यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळातर्फे तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांवर कोणतीही अट घालू नये. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे बारावी व दहावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. त्यांना निकष न लावता सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शासनाने मोफत बी बियाणांचे वितरण करावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे पाखड धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात यावे.खरेदी झालेल्या धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने सुनील लांजेवर, तेजराम मोरघडे, सोनू चंद्रवंशी, गोलू डोहरे, अमरसिंह राजपूत, डील्लू गुप्ता, टोकेश हरिणखेडे, विनीत मोहिते, अशोक आरखेल, बबलू लिल्हारे, आशीष चव्हान, अरविंद टेंभरे, जय भोयर, पंकज लिचडे, महेश हिरापुर, रवि तुरकर, जगदीश कुंजाम यांचा समावेश होता.

Web Title: Give a quick waiver to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.