एकरी ३० हजार रूपयांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:40+5:30
तालुक्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखड होवून काळा पडले आहे. त्यामुळे ते धान आधारभूत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे, पावसाने खराब झालेल्या धानाचा पंचनामा करून एकरी ३० हजार रु पये आर्थिक मदत देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल चार हजार रु पये दराने धान खरेदी करण्यात यावे व सरसकट बोनस जाहीर करण्यात यावा,..........

एकरी ३० हजार रूपयांची मदत द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : परतीच्या पावसामुळे धानपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीने केली आहे. कमिटीने आपल्या मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (दि.८) तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
तालुक्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखड होवून काळा पडले आहे. त्यामुळे ते धान आधारभूत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे, पावसाने खराब झालेल्या धानाचा पंचनामा करून एकरी ३० हजार रु पये आर्थिक मदत देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल चार हजार रु पये दराने धान खरेदी करण्यात यावे व सरसकट बोनस जाहीर करण्यात यावा, जिवनाश्यक वस्तुंचे भाव वाढलेले आहेत ते कमी करु न जीएसटी रद्द करण्यात यावी, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, गोरेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करा, ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी आदि मागण्या निवेदनात नमूद आहेत.
या मागण्यांचे निवेदन तालुका कॉँग्रेस कमिटीने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविले. निवेदन देताना डॉ. झामसिंग बघेले, पी. जी. कटरे, नामदेव किरसान, सि. टी. चौधरी, डेमेंद्र रहांगडाले, ज्योती वालदे, चंद्रशेखर बोपचे, जयतुराबाई चव्हाण, ललिता बहेकार, राहुल कटरे, मनोज वालदे, ओमप्रकाश कटरे आदि उपस्थित होते.