समाजातील कुप्रथांवर प्रहार करण्यासाठी मुली सक्षम व्हाव्या
By Admin | Updated: November 17, 2016 00:24 IST2016-11-17T00:24:49+5:302016-11-17T00:24:49+5:30
आज मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्या मुलांच्या बरोबरीने आपल्या कौशल्याची छाप निर्माण करीत आहेत.

समाजातील कुप्रथांवर प्रहार करण्यासाठी मुली सक्षम व्हाव्या
तहसीलदारांना दिल्या चाव्या : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी
धामणगावरेल्वे : शेतकऱ्यांना त्वरीत सातबारा मिळावा, एखाद्या शेती संदर्भात खरेदी-विक्री व्यवहार केले तर त्वरीत फेरफार करण्यात यावा़ असे सर्व सामान्य शेतकऱ्यांना वाटत असले तरी आॅनलाईन सातबारामुळे अनेक समस्यांना बळीराजांना जावे लागत आहे़ शासनाने त्वरीत आॅनलाईनमुळे शेतकऱ्याला तलाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चकरा थांबवाव्यात अशा विविध मागण्यासाठी तलाठी महासंघाने आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून तहसीलदारांना तलाठी कार्यालयाच्या चाव्या दिल्या आहे़
तलाठी संजाची व महसूल मंडळाची पुर्नरचना, मंडळ अधिकारी कार्यालय भाडे देणे, तलाठी मंडळअधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौणखनिज वसुली याकामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय व मंडळअधिकारी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २४ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यासाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करणे व जुनी योजना सुरू करणे, अव्वल कारकून संवर्गातील पदे मंडळ अधिकारी सवर्गातील कर्मचाऱ्यामधून व मंडळअधिकारी सवर्गातील पदे अव्वल कारकून सवर्गातून भरणे, मंडळ अधिकारी यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली काढणे अशा विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे़
धामणगाव तालुक्यात ३० तलाठी व सात मंडळ अधिकारी कार्यरत आहे़ई फेरफार व्हावा प्रत्येकांना ई चावडीतून सातबारा मिळावा म्हणून प्रत्येक तलाठी आपले आॅन लाईन कामे करण्यासाठी कार्यतत्पर असतांनाअनेक समस्या तलाठी कार्यालयात पहायला मिळत आहे़ तालुक्यातील बारा तलाठ्यांना लॅपटॉप मिळाले नाही तर ३७ गावात इंटरनेट कनेक्टीव्हिटी नाहीत विज कनेक्शन या सारख्या पाय भूत सुविधा नाहीत़ तालुक्यातील तलाठी संघाने वारंवार जिल्हा प्रशासनकडे आपल्या तलाठी बांधवाच्या समस्या मांडल्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी राज्य शासनाचे स्पिड धोरण त्यातच इंटरनेट सेवेचा अभावामुळे तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या आक्रोशाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे विविध समस्यांसाठी तलाठी पटवारी, मंडळअधिकारी समन्वय महासंघाच्या या आंदोलनाचे नेतृत्व गोपाल नागरीकर करीत असून यात मंडळाधिकारी प्रकाश बमनोटे, भारत चिकटे, बी़आऱबावणे, किशोर जऱ्हाड,तलाठी दिनेश ठाकरे, आशिष कडू, विजय गाथे, मिलींद शिरसाठ, राजेश लाड, वाय़एम़जरबडे, बी़आऱबावणे, निलेश स्थूल, प्रफुल गेडाम, नरेंद्र गेडाम, अवचार, गोवींद खुनकर, संगीता धारणे, नारायणी पवार यांच्यासह आंदोलनात सहभागी झाले आहे़ तहसीलदार चंद्रभान कोहरे यांना आपल्या कार्यालयाच्या चाव्या सुपूर्त केल्या आहे़ चांदूररेल्वे येथे तलाठी संघाचे अध्यक्ष पी़व्ही़पिंजरकर, समीर वडनेरकर, स्वप्नील देशमुख यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलनाला सुरूवात झाली.
मागण्या पूर्ण होईपर्यंत तलाठी कार्यालयात पाय ठेवणार नाही. आतातरी सकारात्मक दृष्टीकोनातून आमच्याकडे शासनाने पहावे
-दिनेश ठाकरे,
उपाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ