घाटकुरोडा रेती घाटावरुन चोरटी वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:01:04+5:30

घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Ghatakuroda Sand Laundering | घाटकुरोडा रेती घाटावरुन चोरटी वाहतूक सुरुच

घाटकुरोडा रेती घाटावरुन चोरटी वाहतूक सुरुच

Next
ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या काठावर दोन रेती घाट आहे. पण सध्या या रेती घाटांचा लिलाव न झाल्याने हे दोन्ही रेतीघाट बंद आहे. मात्र डोंगाघाट रेतीघाटावरुन दररोज रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात रेतीच अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.
घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच रस्त्याने घाटकुरोडा येथील विद्यार्थी व नागरिक बाहेर गावी ये-जा करतात. पण या रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया विद्यार्थी आणि नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अनेकवेळा एखादे जड वाहन येत असल्यास रस्त्याच्या कडेला थांबावे लागते. या रस्त्यांने तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा बस व्हाया (घोगरा), (घाटकुरोडा) मार्ग जाऊन तिरोडा येथून ही बस परत येते. पण रस्ता खराब असल्याने ही बस बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी सबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेतीची चोरटी वाहतूक बंद करण्याची मागणी सरपंच भिकाबाई देव्हाळे, नत्थू बिसेन, सूर्यप्रकाश भांडारकर, अरुण खळोदे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
 

Web Title: Ghatakuroda Sand Laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.