नगर पंचायत निवडणुकीकरिता सज्ज व्हा

By Admin | Updated: September 29, 2015 03:19 IST2015-09-29T03:19:16+5:302015-09-29T03:19:16+5:30

नव्याने तयार झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असून या मिनी सार्वत्रिक निवडणुका आहेत.

Get ready for the Nagar Panchayat elections | नगर पंचायत निवडणुकीकरिता सज्ज व्हा

नगर पंचायत निवडणुकीकरिता सज्ज व्हा

गोंदिया : नव्याने तयार झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असून या मिनी सार्वत्रिक निवडणुका आहेत. यातील सर्वाधिक निवडणुका विदर्भात आहेत. जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतींवर १०० टक्के भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापित होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यकर्त्यांनी जोेमाने सर्व ताकदनिशी कामाला लागून विजय संपादन करायचा आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.२५) आयोजित महासंपर्क आढावा बैठकीत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. यावेळी प्रामुख्याने खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, माजी आमदार केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष झामसिंग येरणे, चंद्रपूरचे संघटनमंत्री भोजराज डुबे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम, उमाकांत ढेंगे, संजय कुळकर्णी, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कोठेकर यांनी, महासंपर्क अभियानाचे काम ५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून जिल्हाध्यक्षांकडे सक्रिय सदस्यांची यादी जमा करावी. प्रत्येक बुथवर एक सक्रिय सदस्य तसेच प्रत्येक मंडळामध्ये कमीत कमी शंभर सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. या सक्रिय सदस्यांमध्ये महिला सदस्यांचाही समावेश असावा. ६ आॅक्टोबर रोजी जिल्हाध्यक्षांनी बैठक घेऊन तालुकास्तरावर सक्रिय सदस्यांचे एक दिवसीय अभ्यास वर्गाचे नियोजन करावयाचे आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येक बुथवर गतीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
बैठकीत प्रत्येक तालुक्याचा महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा महामंत्री अंजनकर यांनी केले. बैठकीला ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष चत्रुर्भूज बिसेन, श्याम शिवणकर, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, नामदेव कापगते, जिल्हा परिषद सदस्य अल्ताफ शेख, प्रवीण दहिकर, राजेंद्र बडोले, डी.के.झरारिया, अमित झा, सुनील केलनका, महेंद्र बघेले, दामोदर नेवारे, छत्रपाल तुरकर, सुरेश कोसरकर, नितीन कटरे, घनश्याम अग्रवाल, पंकज सोनवाने यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष, महामंत्री व पदाधिकारी उपस्थित होेते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Get ready for the Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.