जनतेच्या समस्या त्वरित मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ ...

Get people's issues out of the way | जनतेच्या समस्या त्वरित मार्गी लावा

जनतेच्या समस्या त्वरित मार्गी लावा

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ करण्यात यावी. पी.एम.सी बँकेच्या दिवाळखोरीमुळे काही गुंतवणुकदारांचा जीव गेला असून पैशाअभावी अनेकांच्या घरातील लग्नासाठी साठवलेली रक्कम निवृत्तीची रक्कम संकटात सापडलेली आहे. जनतेच्या अनेक समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून सन २०१२ पासून नेहमीच‘अ’ वर्ग पत नामांकन मिळालेली बँक एकदम दिवाळखोरीत कशी गेली. या बँकेत सुमारे ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे अंदाज आहे. याप्रकरणी तातडीने पाऊले उचलून गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई द्यावी, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभर आर्थिक मंदिचे वातावरण निर्माण झाले आहे.आर्थिक मंदिमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर, समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रावर सुमारे ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. कर्ज काढून सरकारचा गाडा चालविण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आली आहे. बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. देशातील मंदीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रावर देखील झाला असून युती सरकार सत्तेवर आल्यापासून सन २०१४ ते मार्च २०१९ या ५ वर्षात राज्यात १४६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, डॉ.योगेंद्र भगत, अ‍ॅड. के.आर.शेंडे, पी.पी.कटरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, जहीर अहमद, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, उषा शहारे, जि.प.सभापती लता दोनोडे, हेमेंद्र रहांगडाले, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, दीपक पवार, गिरीश पालीवाल, जितेंद्र कटरे, राधेलाल पटले, विजय टेकाम, विनोद लिल्हारे, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, सरीता कापगते, प्रभादेवी उपराडे, ममता पाऊलझगडे, परवेज बेग, नटवरलाल गांधी, डॉ.नामदेव किरसान, हेमेंद्र रहांगडाले, शैलेष जायस्वाल, अनिलकुमार गौतम, महेश उके उपस्थित होते.

Web Title: Get people's issues out of the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.