बांबूंपासून रोजगार मिळवा

By Admin | Updated: March 9, 2016 02:53 IST2016-03-09T02:53:43+5:302016-03-09T02:53:43+5:30

जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबू आहे. जिल्ह्यातील बुरड कामगारांचे व बांबू कारागिरांचे जीवन बांबूवर अवलंबून आहे.

Get employment from Bambu | बांबूंपासून रोजगार मिळवा

बांबूंपासून रोजगार मिळवा

पालकमंत्री बडोले : बांबू साठवणूक गोदामाचे भूमिपूजन
गोंदिया : जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबू आहे. जिल्ह्यातील बुरड कामगारांचे व बांबू कारागिरांचे जीवन बांबूवर अवलंबून आहे. शासन कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून जिल्ह्यातील बांबू कारागिरांनी त्यांच्या कौशल्यातून बांबूपासून विविध साहित्य व वस्तूंची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव येथे रविवारी (दि.७) सहवनक्षेत्र सहायक कार्यालयाच्या परिसरात बांबू साठवणूक गोदामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामदास कोहाडकर, सरपंच पपिता जांभूळकर, उपसरपंच त्र्यंबक झोडे, बुरड कामगार संस्थेचे अध्यक्ष कैलास वरखडे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, बुरड व्यवसाय करणारे अत्यंत गरीबीतून जीवन जगत आहे. त्यांचा बाबू हा आधार आहे. या बांबू साठवणूक गोदामामुळे त्यांना बांबू उपलब्ध होणार असून बांबूपासून विविध वस्तू व साहित्यांची येथे निर्मिती करता येईल. त्यांना चांगल्याप्रकारे बांबूपासून कौशल्यपूर्ण वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्या वस्तू प्रदर्शनात ठेवून त्याची विक्र ी मोठ्या प्रमाणात करता येईल.
सर्वसामान्य नागरिकांनासुध्दा या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पूढे म्हणाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन व्यवस्थापनाचे चांगले काम या क्षेत्रात उभे राहू शकते. जिल्हा वन व जलसंपन्न असल्यामूळे जिल्ह्यात एकात्मिक योजना तयार करु न भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा विचार आहे. बोड्या व तलावांचे रोजगार हमी योजनेतून खोलीकरण करु न पाणी साठे निर्माण होण्यासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गहाणे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या व विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने पार पाडावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महागावातील बांबू शिल्पकार उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण करतील असा विश्वास व्यक्त करु न कापगते यांनी, बुरड कामगारांना येथील उपलब्ध होणाऱ्या बांबूपासून चांगल्या प्रकारच्या वस्तू व साहित्यांची निर्मिती करता येईल.
कौशल्यातून कलात्मक बांबू साहित्यांची निर्मिती करावी. जंगलातील वृक्षांचा वापर जळतन म्हणून करु नका. वनविभागाने दिलेल्या गॅस कनेक्शनचा वापर स्वयंपाकासाठी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
कोहाडकर यांनी, बांबू साठवणूक गोदामाचे बांधकाम पावसाळयापूर्वी पुर्ण झाले पाहिजे त्यामुळे बुरड कामगारांना लवकरच तेथे काम करता येईल. रोहयोच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन विकास कामे झाली पाहिजे. शाळेच्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला कॉम्प्लेक्स उभारावे त्यामुळे गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला महागांव तसेच परिसरातील गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Get employment from Bambu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.