शेतीसाठी वीज मिळणार

By Admin | Updated: March 1, 2015 00:59 IST2015-03-01T00:59:57+5:302015-03-01T00:59:57+5:30

शेतकऱ्यांच्या शेतात विविध योजनेअंतर्गत तसेच स्वत:च्या विहीरी असून काही विहीरींना विद्युत पुरवठा अजूनपर्यंत मिळालेल्या नाही.

To get electricity for agriculture | शेतीसाठी वीज मिळणार

शेतीसाठी वीज मिळणार

तिरोडा : शेतकऱ्यांच्या शेतात विविध योजनेअंतर्गत तसेच स्वत:च्या विहीरी असून काही विहीरींना विद्युत पुरवठा अजूनपर्यंत मिळालेल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहेत.
परंतु आ.विजय रहांगडाले यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचेशी पत्रव्यवहार व बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात आला की गोंदिया जिल्ह्यातील सर्व विहीरींना विद्युत पुरवठा शक्य लवकर पूर्ण होणार व जुने अनुशेष भरून निघणार हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या वेळी तालुक्यातील शेतकरी चतुर्भूज बिसेन, हेमराज अंबुले, मुकेश भगत, प्रितम रहांगडाले, रामलाल बाळणे, राजेश रहांगडाले, पंकज कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: To get electricity for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.