डोंगरगाव व फत्तेपूर ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक
By Admin | Updated: July 29, 2015 01:18 IST2015-07-29T01:18:53+5:302015-07-29T01:18:53+5:30
गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव व फत्तेपूर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

डोंगरगाव व फत्तेपूर ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव व फत्तेपूर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
त्यानुसार निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र सादर करावयाचा कालावधी ११ ते १७ आॅगस्ट २०१५ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) असा राहणार आहे. मतदानाची तारीख १ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असून मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबर २०१५ ला सायंकाळनंतर करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी सर्व संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशनपत्राचा नमूना सहजरितीने व २४ तास उपलब्ध व्हावा यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता २२ जुलै २०१५ पासून निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. १ सप्टेंबर २०१५ रोजी ज्या क्षेत्रात ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे तेथे त्या क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)