गौतम यांचा सत्कार

By Admin | Updated: February 28, 2017 01:02 IST2017-02-28T01:02:03+5:302017-02-28T01:02:03+5:30

सी ६० पथकाचे नेतृत्व करताना तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी करीत असलेले यादोराव गौतम यांचा प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करुन गौरविण्यात आले.

Gautam felicitated | गौतम यांचा सत्कार

गौतम यांचा सत्कार

सालेकसा : सी ६० पथकाचे नेतृत्व करताना तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी करीत असलेले यादोराव गौतम यांचा प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करुन गौरविण्यात आले. सालेकसा येथे झालेल्या सत्कार समारोहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौतम यांना शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य दुर्गा तिराले, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, जया डोये, प्रा. शशिनिवास मिश्रा, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यादोराव गौतम हे पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सी-६० पथकात कार्यरत असून मागील अनेक वर्षापासून दुर्गम, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात आपली सेवा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना त्यांनी अनेकवेळा उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम करीत सालेकसा तालुक्याचे सर्वात मोठे स्वयंसेवी संगठन प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्याचा ठरविले.
सत्कार कार्यक्रमात प्रेरणा मित्र परिवाराचे गणेश भदाडे, मधू हरिणखेडे, विजय मानकर, शैलेश बहेकार, कुलतारसिंह भाटीया, प्रकाश टेंभरे, संजय बारसे, मिलिंद चौधरी, मनोज शरणागत, निलेश बोहरे, राहुल हटवार, त्रिरत्न लोणारे, गोविंद पटले, सतिश अग्रवाल, यशवंत शेंडे, कृष्णा मेंढे, राजेंद्र बिसेन, नितीन फुलझेले, सूर्यकांत येळे, मनोज डोये, भूपेश फुंडे, दिनेश कवरे, श्रीकांत भोवते, एम.एन. पटले, नेपाल पटले, प्रमेश बिसेन, संजय साठवणे, पवन पाथोडे, राकेश रोकडे, मनोहर कटरे, दीपक ठाकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gautam felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.