फेरीवाल्याचे सोंग घेऊन घरफोडी करणाची टोळी गजाआड
By Admin | Updated: August 18, 2014 23:34 IST2014-08-18T23:34:01+5:302014-08-18T23:34:01+5:30
आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या

फेरीवाल्याचे सोंग घेऊन घरफोडी करणाची टोळी गजाआड
गोंदिया : आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अशाच टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली. हे सदस्य मध्यप्रदेशातील आहेत.
गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात जिल्हाभर घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना कामाला लावले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे चालविली. त्यांना गुप्त माहितीच्या आधारे फेरीवाल्याचा सोंग धारण करून घरातील संपूर्ण ज्ञान घेवून रात्रीच्यावेळी चोरी करण्याचे नियोजन कसे आखले जाईल याच्या विवंचनेत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात राजेश ऊर्फ खुनून छिल्टूराम सिसोदीया राजपूत ठाकूर /धुर्वे (२०) रा. डोंगालिया पोलिस ठाणे छनेरा जि. खंडवा, प्यारेलाल देवलाल कुंभरे (३५) व राजू देवलाल कुंभरे (२६) दोन्ही रा. मुंढरई पोलिस ठाणे कानेवाडा जि. शिवणी मध्यप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. य् ाा प्रकरणातील आरोपी जलूलकुमार दोसालाल ऊर्फ मकारसिंग सिसोदीया राजपूत ठाकूर/धुर्वे रा. लिमो पोलिस ठाणे गंढई जि. राजनांदगाव छत्तीसगड हा फरार आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रवीण नावडकर, सहायक फौजदारा सुधीर नवखरे, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, अन्ना ब्राम्हणकर, शंकर साठवणे, रामलाल सार्वे, संतोष काळे, भुवनलाल देशमुख, अजय सव्वालाखे, राजकुमार खोटेले, तुलसीदास लुटे, नितीन जाधव, संजय शेंडे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, सूर्यप्रकाश सयाम, सोहनलाल लांजेवार यांनी केली.
(तालुका प्रतिनिधी)