विदेशी दारुची अवैध वाहतूक करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST2021-07-18T04:21:16+5:302021-07-18T04:21:16+5:30

परिसरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची वाहतूक होत आहे. गावात सुद्धा भर चौकात खुलेआम हातोहात दारु विक्रीचे प्रमाण वाढलेले दिसत ...

Gajaad smuggler of foreign liquor | विदेशी दारुची अवैध वाहतूक करणारा गजाआड

विदेशी दारुची अवैध वाहतूक करणारा गजाआड

परिसरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची वाहतूक होत आहे. गावात सुद्धा भर चौकात खुलेआम हातोहात दारु विक्रीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. यातूनच शुक्रवारी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बोंडगावदेवी परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान मोटारसायकलने जाणाऱ्यावर संशय येताच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १८० व ९० मीलीच्या ३५ बॉटल्स अशी तीन हजार ८५० रूपये किंमतीची विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी दारू व २० हजार रूपये किंमतीची दुचाकी क्रमांक एमएच ३५-व्ही ६३०४ असा एकूण २३ हजार ८५० रूपयांचा माल जप्त केला आहे. तर दारूची वाहतूक करणाऱ्या गोठणगाव येथील महेश मिश्रीलाल राठी (५२) याला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पुण्यप्रेडीवार, विजय कोटांगले, रमेश सेलोकर, गोंडाणे यांनी ही कारवाई केली असून कलम ६५ (ई) ७७ (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात पुण्यप्रेडीवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Gajaad smuggler of foreign liquor