गदारोळाने ग्रामसभा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 00:54 IST2017-04-30T00:54:41+5:302017-04-30T00:54:41+5:30
दारुबंदीचा विषय घेऊन आमगाव खुर्द (सालेकसा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तात्पुरत्या ...

गदारोळाने ग्रामसभा स्थगित
महिलांची पोलीसठाण्यात धडक : अध्यक्ष व सचिव नियुक्तीसाठी माजला गोंधळ
सालेकसा : दारुबंदीचा विषय घेऊन आमगाव खुर्द (सालेकसा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तात्पुरत्या स्वरूपात ग्रामसभेचा अध्यक्ष कोण आणि सचिव कोण राहील यासाठी मोठा गोंधळ माजला. महिलांच्या भावनेला योग्य प्रतिसाद न देता फक्त गोंधळ घालण्याचे काम काही लोक करीत असल्यामुळे प्रचंड गदारोळाने ग्रामसभा अखेर स्थगित करावी लागली. परिणामी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन दारुबंदीचा आवाज बुलंद केला.
तालुका मुख्यालयाच्या समावेश असलेली सर्वात मोठी ग्राम पंचायत आमगाव खुर्द (सालेकसा) या ग्राम पंचायतीत संपूर्ण सालेकसा शहराचा समावेश आहे. विविध ठिकाणी वैध-अवैध स्वरुपाची दारु दुकाने चालतात. दारुची दुकाने जरी परवाना धारक असली तरी नियमानुसार चालत असली तरी त्या अनेकांना विशेष करून महिला वर्गाना त्रासदायक वाटत असतात. त्यामुळे येथील महिलावर्ग संतप्त झाल्या आहेत. आपला आवाज उठवीत दारुबंदीची मागणी करीत आहेत. याबाबीला लक्षात घेत इतर काही ज्वलंत मुद्यांना घेऊन ग्राम पंचायत आमगाव खुर्द येथे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. त्यांच्या मनात दारु दुकानाविरूध्द मोठा आक्रोश आहे. अससल्याचे दिसून येत होते. या परिस्थितीला ग्रामसभा सुरु होताच सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. सभेचा अध्यक्ष कोण राहणार यावर खूप वेळा पर्यंत मतैक्य झाले नाही. शेवटी गावातील प्रतिष्ठीत नागरिक वासुदेव चुटे यांना अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. परंतु यावेळी अनेक महिलांना वाटते की अध्यक्षपदी महिलेला नियुक्त केले पाहिजे व गोंधळ सुरुच राहीला. त्यानंतर सभेचा सचिव नियुक्त करण्याचा कारण सभेच्याच दिवशी ग्राम विस्तार अधिकारी (ग्रा.पं.सचिव) के.ए.आचले यांची न्यायालयात पेशी होती. त्यामुळे ते ग्रामसभेत नव्हते. यावेळी काही लोकांनी सचिव कोणाला ठेवावे याबद्दल मार्गदर्शन घेतले. तेव्हा पंचायत समितीवर त्यांना सल्ला मिळाल्यावर जि.प.शाळेच्या एका शिक्षिकेला सचिव नियुक्त करण्यात आले. परंतु याबाबत ही लोकांच्या मतैक्य झाले नाही. ग्राम पंचायत परिसरात सारखा गोंधळ चालत राहीला व कुणीकुणाचे ऐकून घेण्यात तयार नव्हते. काही वेळ निघून गेल्यावर ही महिलांच्या भावना कुणी ऐकून घेण्यास तयार नव्हते तेव्हा संतप्त महिलांनी आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळविला. सरळ ठाणेदाराच्या कक्षावर धडक दिली व न्यायाची मागणी करू लागले. शेवटी सहायक पोलीस निरीक्षक बी.एम.पवार यांनी त्यांची समजूत घातली. पं.स. सभापती, तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंच योगेश राऊत यांनी ही पुन्हा ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)