गाडगेबाबांचा आदर्श जीवन फुलविणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:31 IST2017-02-26T00:31:48+5:302017-02-26T00:31:48+5:30
निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अव्याहतपणे दिन दुबळ्यांची सेवा करून कर्मकांडावर प्रहार केला. अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका.

गाडगेबाबांचा आदर्श जीवन फुलविणारा
भाग्यवान फुल्लुके : गाडगेबाबा जयंती समारंभ उत्साहात
बोंडगावदेवी : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अव्याहतपणे दिन दुबळ्यांची सेवा करून कर्मकांडावर प्रहार केला. अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका. मुलाबाळांना शिक्षित करा, देवाचे रुप गोरगरीबांमध्ये पाहा. आपले गाव निटनेटके स्वच्छ ठेवा, असा मार्मिक हितोपदेश आपल्या रसाळ कीर्तनातून संत गाडगेबाबा यांने दिला. कीर्तनातून साध्या भोळ्या अडाणी समाजाला जागृत करण्याचे काम करीत तळागाळातील सामान्य माणसांचे जीवन फुलविण्याचे काम गाडगे बाबांनी केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान फुल्लुके यांनी केले.
आनंद बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती युवा संघाच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा जयंतीदिनी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच मयाराम रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून भाग्यवान फुल्लुके, कुंडलिक भैसारे, नंदलाल बोरकर, वामन रामटेके, धन्नु वालदे, अशोक रामटेके, संतोष टेंभूर्णे, वर्षा लोणारे, कविता टेंभूर्णे, ललीता रामटेके, अमर ठवरे, नितीन रामटेके उपस्थित होते.
संचालन आरिफ वालदे, प्रास्ताविक गौतम रामटेके तर आभार विश्वास लोणारे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, पुरूष उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय
स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गाडगेबाबाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच राधेश्याम झोळे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तुळसीदास बोरकर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष शामकांत नेवारे, परीवेक्षक एम.एम.धुर्वे, माधोराव पुस्तोडे, प्राथमिक आरोग्य विभागाचे डॉ. कुंदन कुळसुंगे, नित्यानंद पालीवाल, नरेद्र बनपूरकर, बरैय्या, धनंजय बनपूरकर व ग्रामसेवक एल.एन.ब्राम्हणकर, किशोर सहारे, राष्ट्रपाल ठवरे व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. (वार्ताहर)