गाडगेबाब क्लबने कबड्डी स्पर्धेत मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:30 IST2021-02-16T04:30:30+5:302021-02-16T04:30:30+5:30

कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी राजकुमार फुंडे होते. दीप प्रज्वलन प्रमोद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ...

Gadgebab Club won the Kabaddi tournament | गाडगेबाब क्लबने कबड्डी स्पर्धेत मारली बाजी

गाडगेबाब क्लबने कबड्डी स्पर्धेत मारली बाजी

कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी राजकुमार फुंडे होते. दीप प्रज्वलन प्रमोद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निखिल पशिने, धनवंत शिवणकर, सुखराम फुंडे, कांशीराम हुकरे, हरी शिवणकर, मुकेश मेश्राम, सुरेंद्र नायडू, विजय नागपुरे, वसंत महारवाडे, ईकबाल मोगल, रितेश चुटे, बबन मस्करे, बलीराम फुंडे उपस्थित होते. याप्रसंगी बनगावचे पोलीस पाटील संजय हत्तीमारे यांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या मैदानी खेळांचे असाधारण महत्त्व सांगीतले. या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक गोंदिया येथील गाडगेबाबा क्लबने पटकाविला, तर द्वितीय क्रमांक गोंदिया येथील गोविंदपूर क्लबने पटकाविला. रोख रक्कम व ट्रॉफी देऊन संघांना पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धेसाठी माँ काली क्रीडा मंडळाचे प्रदीप भांडारकर, सोहेल मोगल, नितीन डोये व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Gadgebab Club won the Kabaddi tournament