कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:47+5:302021-04-23T04:31:47+5:30
देवरी: आमगाव व सालेकसा तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहून या विरुद्ध लढण्याकरिता आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या स्थानिक ...

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी
देवरी: आमगाव व सालेकसा तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहून या विरुद्ध लढण्याकरिता आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी माहिती दिली.
आढावा बैठकीला देवरी तालुक्यातील देवरी व चिचगड ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्रवर्तक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय सेवेबाबत आमदार कोरोटे यांनी चर्चा करून आढावा घेतला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आपण आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास सांगितले. लोकांच्या आरोग्य सेवेसाठी ज्या-ज्या साहित्याची गरज आहे. त्या साहित्याची पूर्तत: मी आपल्या विकास निधीतून करणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून तिन्ही तालुक्यात वैद्यकीय साहित्य यात ऑक्सिजन सिलिंडर, बाईटॉप मशीन, बाईटल मॉन्टोर, एलिवेटर बेड अशाप्रकारचे साहित्य उपलब्ध होणार आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, ग्रामीण रुग्णालय देवरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाणे, डॉ. गजभिये, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, कमलेश पालीवाल, नंदुप्रसाद शर्मा उपस्थित होते.