अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:49 IST2018-12-11T23:48:46+5:302018-12-11T23:49:29+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी निदर्शने केली.
या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. येथील जयस्तंभ चौकातून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टिका केली. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.
या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनातून केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मानधनातील वाढ १ आॅक्टोबरपासून एरियससहित देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, किमान १८ हजार रुपये मासीक वेतन द्यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ३ हजार रुपये मासिक पेंशनचा कायदा करण्यात यावा, ९८ लाभार्थ्यांना एकमुस्त सेवानिवृत्ती लाभाचे चार वर्षापासून एक रक्कमी लाभ जिल्हा परिषद महिला बालकल्याणच्या हलगर्जीपणामुळे मिळाला नाही. याची चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी.
भाऊबिजची रक्कम अद्यापही सडक-अर्जुनी देवरी, गोंदिया प्रकल्पात मिळाली नाही, ती देण्यात यावी, गोरेगाव प्रकल्पात मार्च २०१८ चे मानधन मिळाले नाही ते देण्यात यावे. प्रवास भत्याची थकित रक्कम व देवरी प्रकल्पामध्ये २०१३ पासून देण्यात आली नाही.
ती त्वरीत देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शकुंतला फटिंग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, जिल्हा कोषाध्यक्ष जिवनकला वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष विणा गौतम, विजया डोंगरे,राजलक्ष्मी हरिणखेडे, जिल्हा सहसचिव ब्रिजुला तिडके, कांचन शहारे,सुनिता मलगाम, जिल्हा संगठन लालेश्वरी शरणागत, विठा पवार, अंजना ठाकरे, पोर्णिमा चुटे,भुमेश्वरी रहांगडाले,ज्योती लिल्हारे, वच्छला भोंगाडे, मीनाक्षी पटले यांचा समावेश होता.