सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन उत्तम व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:08 IST2018-02-08T00:08:37+5:302018-02-08T00:08:47+5:30
२१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान संपादन करण्यासाठी तत्पर असावे. विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन हे एक उत्तम व्यासपीठ असून शिक्षकांनी असे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन टी. बी. भेंडारकर यांनी केले.

सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन उत्तम व्यासपीठ
ऑनलाईन लोकमत
इसापूर : २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान संपादन करण्यासाठी तत्पर असावे. विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन हे एक उत्तम व्यासपीठ असून शिक्षकांनी असे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन टी. बी. भेंडारकर यांनी केले.
जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा वडेगाव स्टेशन येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद खुणे, सरपंच रश्मी खुणे, पोलीस पाटील रेखा राऊत, शा.व्य.समितीच्या उपाध्यक्ष मंगला वालदे, उपसपरंच रवि खुणे, विजय खुणे, मुख्याध्यापक एम.आर.भैसारे, अरविंद खुणे, आर.डी.पातोडे, के.एस.बोरकर, सुभाष खुणे, बंडू वालदे, योगीता खुणे, आशा खुणे, विक्रम मानकर, रश्मी संगू उपस्थित होते.
या दरम्यान लोकमत समुहातर्फे घेण्यात आलेल्या संस्काराचे मोती स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन संतोष रोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच २०१६-१७ मधील इयत्ता चौथी व सातवीतील प्रथम क्रमांक, प्राप्त विद्यार्थ्याना अंजना खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस साक्षी अरुण खुणे तसेच साहील भाष्कर दामले देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मागील अनेक वर्षापासून मुख्याध्यापक सु.मो.भैसारे यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनातून सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. यशस्वीतेसाठी जे. एस. मेश्राम, ए. पी. उके, जे. एस. कोडापे, ए.बी.फाये, व्ही.बी.भैसारे, ए.पी.मेंढे , किम राऊत, रितीक सोनवाने, प्रिती सोनवाने, मनीषा सोनवाने, मनिष सोनवाने, आदर्श कुंभरे, जयेश कोहरे, कृष्णा वाघधरे, नितेश रामटेके, धम्मदीप टेंभुर्णे, नरेश रामटेके आदींनी केले.