सूर्याटोलात रेल्वे ट्रॅकला ‘फ्रॅक्चर’
By Admin | Updated: September 9, 2015 01:51 IST2015-09-09T01:51:45+5:302015-09-09T01:51:45+5:30
रेल्वे ट्रकवर पडलेल्या तड्यामुळे (फ्रॅक्चरमुळे) नागपूरकडे जाणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्पे्रस सुमारे १५ मिनीटे उशिरा सोडण्यात आली.

सूर्याटोलात रेल्वे ट्रॅकला ‘फ्रॅक्चर’
महाराष्ट्र एक्स्प्रेस उशिरा सुटली : धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले
गोंदिया : रेल्वे ट्रकवर पडलेल्या तड्यामुळे (फ्रॅक्चरमुळे) नागपूरकडे जाणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्पे्रस सुमारे १५ मिनीटे उशिरा सोडण्यात आली. मंगळवारी (दि.८) सकाळी हा प्रकार घडला.
गोंदियावरून नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्पे्रस येथून ८.२० वाजता गोंदिया स्थानकावरून रवाना होते. त्यानुसार मंगळवारी (दि.८) गाडी वेळेवर सुटली मात्र सूर्याटोला येथे किमी. १००२ व पोल क्रमांक २१-२३ दरम्यान चालकाला रेल्वे ट्रॅकवर तडा दिसला. रेल्वेच्या भाषेत याला ट्रॅक फ्रॅक्चर म्हटले जात असून हा प्रकार दिसल्याने चालकाने गाडी तेथेच थांबवून ठेवली. याबाबत संबंधीत विभागाला माहिती दिल्यावर व त्यामुळे काही थोका नसल्याचे लक्षात घेत सुमारे १५-२० मिनीटे उशिराने गाडी सोडण्यात आली.
थंडी व गरमीमुळे ट्रॅक आखुडते व त्यामुळे त्यात तडा येतो. त्याला लोखंडाची पट्टी लावून जोडले जाते व वेळेचे नियोजन करून तेवढा भाग बदलविला जातो. त्यानुसार ट्रॅकवर तडा आल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)