मुख्य बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी
By Admin | Updated: October 18, 2014 23:26 IST2014-10-18T23:26:55+5:302014-10-18T23:26:55+5:30
दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून चारचाकी वाहनांना मार्केट परिसरात प्रवेशास

मुख्य बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी
गोंदिया : दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून चारचाकी वाहनांना मार्केट परिसरात प्रवेशास मज्जाक करण्यात आला आहे.
बाजारातील चारही मुख्य मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. सोबतच वाहतूक पोलिसांची ड्यूटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतुकीची कोंडी लक्षात घेता चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी असली तरीही कोणत्या ना कोणत्या मार्गाने काही वाहने मार्केटमध्ये शिरत आहेत. त्यामुळे कोंडी होणे सुरूच आहे.
जेमतेम पाच दिवसांवर दिवाळी आली आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत आहे. सध्या बाजारात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विधानसभा निवडणूक असल्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत दिवाळीची धामधूम जाणवली नाही. मात्र मतदान होताच सर्वांना दिवाळी आठवली असून खरेदीसाठी एकच लगबग सुरू झाली आहे. यामुळेच सर्वांची बाजाराकडे धाव वाढली असून बाजारपेठ फुगून गेली आहे.
यामुळेच बाजारात वाहतूकीच्या कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. मुख्य बाजार लाईनमध्ये प्रवेश करताना जैन मंदिरसमोर, पोलीस स्टेशन मार्गाने प्रवेश करताना, दुर्गा चौक मार्गाने येताना तसेच श्री टॉकीज मार्गाने येताना अशा चारही मुख्य मार्गांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
यामध्ये जैन मंदिरजवळ दोन, लक्की स्टोअर्सजवळ एक, आमदार अग्रवाल यांच्या घरासमोर एक, तर वैशाली राज पुरोहित या दुकानासमोर दोन कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे.
शिवाय बाजारातील मुख्य चौक असलेल्या गोरेलाल चौकात एक व गांधी पुतळा चौकातही एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)