रेतीचा अवैध उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By Admin | Updated: January 10, 2015 01:33 IST2015-01-10T01:33:15+5:302015-01-10T01:33:15+5:30

डुग्गीपार पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बाम्हणी-खडकी नाल्याजवळ सायंकाळी ४ वाजता अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरसह रेतीचोरांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले.

Four tractors of illegal sand bargo were seized | रेतीचा अवैध उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडले

रेतीचा अवैध उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडले

सडक-अर्जुनी : डुग्गीपार पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बाम्हणी-खडकी नाल्याजवळ सायंकाळी ४ वाजता अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरसह रेतीचोरांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले.
गेल्या अनेक दिवसांपासून सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, बाम्हणी-खडकी, सौंदड, पांढरी, म्हसवानी, डव्वा, डोंगरगाव-डेपो, पिपरी, डोंगरगाव-खजरी, कोहमारा, सालेधारणी, पुतडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती माफीया कडून रेतीची मोठ्या प्रमाणात देवरी, साकोली, गोरेगाव या ठिकाणी दररोज सायंकाळपासून सकाळी पहाटेपर्यंत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती पाठविल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच डुग्गीपार सापळा रचून सायंकाळी ४ वाजता बाम्हणी-खडकी येथील संजय रामराव वट्टी ट्रॅक्टर क्र.एमएच ३५ जे २६२१, राजकुमार तुळशीराम लंजे, गजानन दुधराम उईके एमएच ३५ जी ४८९४, फुटाळा येथील देवानंद सुरेश सोनवाने, एमएच ३५ जी ६१७१, देवीदास अरुण बेंदवार एमएच ३५ जी ४१४० यांचा १२ लाख १२ हजारांच्या रेतीसह ट्रॅक्टर पकडण्यात यश आले.
ही कारवआई डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनात गणपत तुमडाम, प्रशांत केदार, आनंद ईशकापे, राजकुमार राऊत, प्रिती उईके, दिलीप राऊत, मुकेश न्यायमूर्ती या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Four tractors of illegal sand bargo were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.