चार हजार उमेदवारांना गावाच्या कारभारात रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST2021-01-01T05:00:00+5:302021-01-01T05:00:22+5:30

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांना बुधवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी ६८५ मतदान केंद्रावरून १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

Four thousand candidates interested in village affairs | चार हजार उमेदवारांना गावाच्या कारभारात रस

चार हजार उमेदवारांना गावाच्या कारभारात रस

ठळक मुद्दे१६३४ जागांसाठी ३९०४ उमेवार रिंगणात : सर्वाधिक अर्ज गोंदिया तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होऊ घातली असून, यासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३०६१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर त्यापूर्वी आठही तालुक्यांतून ७४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे आता एकूण ३९०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यांना गावाच्या कारभारात रस असल्याचे चित्र आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांना बुधवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी ६८५ मतदान केंद्रावरून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात चार हजार तरुण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार आहे. 
४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, याच दिवशी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेमके किती उमेदवार माघार घेतात त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक गोंदिया तालुक्यात होत ३६१ जागेसाठी ९७२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, 
तर देवरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या २५९ जागांसाठी ५०३ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या २६१ जागांसाठी ५५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 

Web Title: Four thousand candidates interested in village affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.