सणासुदीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या
By Admin | Updated: September 25, 2014 23:24 IST2014-09-25T23:24:46+5:302014-09-25T23:24:46+5:30
दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या

सणासुदीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या
नवरात्रौत्सवात वाढीव डबे : गोंदिया-सिकंदराबाद सुपरफास्ट सुरू
गोंदिया : दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व गाड्यांचा लाभ गोंदियावासीयांना होणार आहे.
मुंबई-हावडा-मुंबई (०२०४१/०२०४२) ही गाडी चार दिवस भुसावळ, नागपूर, गोंदिया व बिलासपूरमार्गे धावणार आहे. ही गाडी मुंबईवरून मंगळवारी दुपारी १.३० वाजता, २१ व २८ आॅक्टोबर तसेच ४ व ११ नोव्हेंबरला सुटणार आहे. ही गाडी हावडा येथे बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजता, दि. २३ व ३० आॅक्टोबर तसेच ६ व १३ नोव्हेंबरला सुटून मुंबईला शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. मुंबई-हावडा (०२०८३/०२०८४) ही गाडी मुंबईवरून दि.२१ व २८ आॅक्टोबर तसेच दि.४ व ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून दि.२२ व २९ आॅक्टोबर तसेच ५ व १२ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही गाडी मुंबई येथे गुरूवारी दुपारी १.५० वाजता पोहोचेल. ही गाडी चार दिवस धावणार असून कल्याण, भुसावळ, नागपूर, गोंदिया व बिलासपूर असा या गाडीचा मार्ग राहणार आहे.
बिलासपूर-पूणे-बिलासपूर (०८२९५/०८२९६) ही गाडी सात दिवस राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, बिलासपूरमार्गे धावणार आहे. ही गाडी बिलासपूरवरून दि.३० सप्टेंबर, ७, १४, २१, २८ आॅक्टोबर तसेच ४ व ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. पुणे येथे बुधवारी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. आपल्या परतीच्या प्रवासासाठी पुणेवरून दि.१, ८, १०, २२, २९ आॅक्टोबर, तसेच ५ व १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटणार आहे. प्रिमियम स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनल -हावडा (०२२४१/०२२४२) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन दि.२३ व ३० सप्टेंबर रोजी दुपारी १.२० वाजता सुटेल व हावडा येथे बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून २५ सप्टेंबर व २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल आणि शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पोहोचेल. ही गाडी दोन दिवस भुसावळ-नागपूर व बिलासपूरमार्गे धावणार आहे.