ट्रकचालकांना लुटणारे चौघे जण गजाआड
By Admin | Updated: August 6, 2015 00:43 IST2015-08-06T00:43:43+5:302015-08-06T00:43:43+5:30
धावत्या ट्रकला थांबवून ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

ट्रकचालकांना लुटणारे चौघे जण गजाआड
एलसीबीची कारवाई : आणखी गुन्हे उघड होणार
गोंदिया : धावत्या ट्रकला थांबवून ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तिरोडा ते तुमसर मार्गावर काही महिन्यांपासून ट्रक चालकांना लुटण्याचे काम सुरू होते. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून २७ जुलै रोजी निखिल ऊर्फ निक्या सोमेश्वर पटले (२१), स्वप्नील ऊर्फ पेंटा प्रदीप रोडगे (२२) या दोघांना पकडले. त्या प्रकरणातील प्रणय ऊर्फ कल्या प्रकाश तिरपुडे, रजत दामोदर भगत यांना आपले दोन साथीदार पकडल्याची माहिती मिळताच ते पसार झाले. परंतु पोलिसांनी त्यांनाही अटक केली. सदर कारवाई अ.पो.अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पो.निरीक्षक प्रवीण नावडकर, पो.उपनिरीक्षक वर्गे, हवालदार रामलाल सार्वे, अर्जुन कावळे, संतोष काळे, जगनाडे यांनी केली.