शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

गोंदिया जिल्ह्यात नव्याने बांधलेल्या विहिरीत गुदमरून पिता-पुत्रासह दोन शेजारी मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:03 IST

गोंदिया जिल्ह्यात विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सालेकसा तालुक्यातील देवरी पानगाव येथे घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे विहिरीचे पूजन करण्यासाठी सुरू होती तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: नव्यानेच बांधलेल्या विहिरीचे पूजन करण्यासाठी विहिरीतीतले पाणी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पिता-पुत्रासह दोन शेजाºयांना आपले प्राण गमावावे लागल्याची धक्कादायक घटना सालेकसा येथे घडली. आमगाव तालुक्यातील कन्हारटोला येथे रहात असलेल्या भांडारकर पिता-पुत्रासह दोन शेजाऱ्यांचा २ जुलैला सकाळी करुण अंत झाल्याची घटना घडली. आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरासमोर विहीर बांधली होती. तिचे पूजन करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी १ रोजी संध्याकाळी विहिरीचे पाणी स्वच्छ करण्याच्या हेतूने विहिरीत ब्लिचिंग पावडर, फिटकरी, तुरटी यांचे मिश्रण टाकले होते.  विहिरीतले गढूळ व अस्वच्छ पाणी काढण्यासाठी मोटर पंप  लावण्यात आली होती. या मोटारीचा फूटवॉल काढण्यासाठी त्यांचा मुलगा झनकलाल हा विहिरीत उतरला. मात्र उतरल्याबरोबर त्याला अस्वस्थ वाटू लागले व तो कसातरी करू लागला. ते पाहताच आत्माराम हेही विहिरीत उतरले. काही क्षणातच दोघेही गतप्राण झाले.

ही घटना पाहणाऱ्या एका मुलाने तात्काळ शेजाऱ्यापाजाऱ्यांना आवाज दिला. ते ऐकून राजू भांडारकर व धनराज गायधने हे दोघेही विहिरीत उतरले. मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. या चौघांसोबतच राधेशाम नावाचा व्यक्तीही विहिरीत उतरत होता. मात्र अर्ध्यावर उतरल्यानंतर विहिरीतील विषारी वायूची गंभीरता लक्षात आल्याने तो वरती परत आला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. या चौघांच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू